Headlines

मराठवाड्याचा अनुशेष दूर करा!:पंतप्रधानांच्या बैठकीत खासदार रामराव वडकुतेंची विशेष आराखड्याची मागणी




दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदारांच्या विशेष संवाद बैठकीत मराठवाड्याचा विकास अनुशेष दूर करण्यासाठी विशेष विकास आराखडा, औद्योगिक गुंतवणूक वाढविण्यासाठी स्वतंत्र औद्योगिक धोरण, रोजगारनिर्मिती, पायाभूत सुविधा, शेती व सिंचन विकास यासह इतरबाबीच्या विकासासाठी विशेष आराखडा आवश्यक असल्याची आग्रही मागणी खासदार रामराव वडकुते यांनी केली आहे. दिल्ली येथे राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत विशेष संवाद कार्यक्रम झाला. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी आपल्या प्रदीर्घ संसदीय अनुभवाच्या आधारे नव्या खासदारांना संसदीय परंपरा, जनप्रतिनिधी म्हणून असलेल्या जबाबदाऱ्या, जनसेवेचे मूलमंत्र आणि संसदेमार्फत राष्ट्रहितासाठी प्रभावी योगदान कसे देता येईल, याबाबत अत्यंत मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. रामराव वडकुते यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासंदर्भातील विविध महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर चर्चा केली. विशेषतः धनगर समाजाच्या प्रलंबित प्रश्नांचे तातडीने निराकरण, मराठवाड्याचा विकास अनुशेष दूर करण्यासाठी विशेष विकास आराखडा, औद्योगिक गुंतवणूक वाढविण्यासाठी स्वतंत्र औद्योगिक धोरण, रोजगारनिर्मिती, पायाभूत सुविधा, शेती व सिंचन विकास, तसेच महाराष्ट्राला “संतांची भूमी” म्हणून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर अधिक प्रभावीपणे विकसित करण्यासाठी विशेष पर्यटन धोरण राबविण्याची आवश्यकता असल्याचे मत त्यांनी मांडले. याशिवाय मराठवाड्यात उद्योग, शिक्षण, आरोग्य, रेल्वे, रस्ते, क्रीडा सुविधा, पर्यटन, कृषी मूल्यवर्धन, जलसंधारण आणि ग्रामीण विकासासाठी केंद्र सरकारकडून अधिकाधिक सहकार्य मिळावे अशी अपेक्षाही खासदार वडकुते यांनी व्यक्त केली. महाराष्ट्रातील संत परंपरा, ऐतिहासिक व धार्मिक स्थळांचे जागतिक दर्जाचे पर्यटन केंद्र म्हणून संवर्धन व विकास करण्याबाबतही त्यांनी पंतप्रधानांचे लक्ष वेधले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्याया भेटीमुळे महाराष्ट्राच्या विकासाशी संबंधित विविध विषयांना नवी दिशा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *