मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर अतिशय गंभीर आरोप केले होते. “बावनकुळेंच्या दबावामुळे आणि सांगण्यावरूनच मराठा समाजाची कुणबी जात प्रमाणपत्रे आणि त्यांची वैधता (Va
.
नार्को टेस्ट करण्यास माझी पूर्ण संमती
मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या नार्को टेस्टच्या मागणीवर बोलताना बावनकुळे म्हणाले, “माझी नार्को टेस्ट करता येईल, त्याला माझी कोणतीही हरकत नाही किंवा अडचण नाही. माझी त्याला पूर्ण परवानगी आहे.” अशा शब्दांत त्यांनी जरांगेंचे आव्हान स्वीकारण्याची तयारी दर्शवली.
जात पडताळणी समितीचे अधिकार आणि सरकारचा हस्तक्षेप
कुणबी प्रमाणपत्रे रद्द करण्यासाठी फोन केल्याच्या आरोपावर बावनकुळे यांनी तांत्रिक बाजू स्पष्ट केली. ते म्हणाले, “जात पडताळणी विभाग हा अर्धन्यायिक आहे. या समितीला स्वतंत्र आणि न्यायिक अधिकार असतात. या प्रक्रियेमध्ये राज्य सरकार, कोणताही मंत्री किंवा अधिकारी अजिबात हस्तक्षेप करू शकत नाही. मी स्वतः जरी प्रयत्न केला तरी, मी जात पडताळणी समितीला फोन करून निर्णय बदलण्यास सांगू शकत नाही. त्यामुळे बावनकुळे किंवा दुसऱ्या एखाद्या मंत्र्यांनी फोन करून जात प्रमाणपत्रे रद्द करायला लावली, हा आरोपच मुळात चुकीचा आहे. असे या राज्यात काय, कुठल्याच राज्यात होऊ शकत नाही.”
अन्याय वाटत असल्यास उच्च न्यायालयात जाण्याची मुभा
कुणबी प्रमाणपत्रांची व्हॅलिडिटी रद्द झाल्याच्या तक्रारीवर बावनकुळे म्हणाले, “जात पडताळणी समिती कागदपत्रे आणि पुरावे तपासूनच निर्णय घेते. हा त्यांचा अंतिम निर्णय नसतो. जर कोणाला वाटत असेल की समितीचा निर्णय चुकला आहे किंवा त्यांच्यावर अन्याय झाला आहे, तर त्यांना थेट उच्च न्यायालयात अपील करण्याचा अधिकार आहे. तिथून तातडीने न्याय किंवा स्थगिती मिळवता येते, त्यामुळे संबंधितांनी ही प्रक्रिया अवलंबली तर जास्त बरे होईल.”
आरोप-प्रत्यारोप करण्यात मला रस नाही
“तुमच्या एका बावनकुळेंसाठी मी भाजपचे २५ ते ३० आमदार पाडून दाखवेन आणि देवेंद्र फडणवीसांचे वाटोळे करेन,” या मनोज जरांगे यांच्या थेट इशाऱ्यावर बोलणे बावनकुळे यांनी टाळले. ते म्हणाले, “आरोप करणे त्यांचे काम आहे, पण रोज आरोप-प्रत्यारोप करत बसणे, हा माझा पिंड नाही. ते काय बोलले, यावर मी जास्त चर्चा करणार नाही किंवा प्रत्युत्तरही देणार नाही. मला केवळ वस्तुस्थिती मांडायची होती, ती मी मांडली आहे.”
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या जागेचा वाद सुटला
याच पत्रकार परिषदेत बावनकुळे यांनी ठाणे जिल्ह्यातील भाईंदरपाडा येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या जागेबद्दल एक महत्त्वाचा निर्णय जाहीर केला. ते म्हणाले, “११०० एकर जागेवरून खाजगी दावेदार आणि वन विभाग यांच्यात वाद सुरू होता. याप्रकरणी आम्ही अंतिम अर्धन्यायिक आदेश काढला असून, ही सर्व जागा आता ‘वन विभागाच्या’ नावाने करण्यात आली आहे. त्यामुळे ही जागा खासगी लोकांच्या घशात घातली जात असल्याच्या बातम्या खोट्या ठरल्या आहेत. वनाची जागा वनालाच राहिली पाहिजे, हा सरकारचा उद्देश साध्य झाला आहे.”
संबंधित बातमी वाचा…
उद्धव ठाकरेच बरे म्हणायची वेळ येईल! कुणबी प्रमाणपत्रांवरून मनोज जरांगे आक्रमक, शिंदे-फडणवीस आणि बावनकुळेंवर गंभीर आरोप

मराठा आरक्षणाच्या माध्यमातून मिळालेली कुणबी प्रमाणपत्रे आणि त्यांची जात वैधता (Validity) रद्द केल्याच्या प्रकरणावरून मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारवर घणाघाती हल्ला चढवला आहे. पत्रकार परिषदेत अत्यंत जरांगे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर ‘मराठा समाजाचे वाटोळे करण्याचा कट’ रचल्याचा थेट आरोप केला आहे. पुराव्यांचे ढीग सोबत घेऊन आलेल्या जरांगे यांनी अनेक गौप्यस्फोट करत महायुती सरकारला आगामी निवडणुकीत सळो की पळो करून सोडण्याचा इशारा दिला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी