Headlines

कोकणातील राजकारणात मोठी पोकळी:भाजपचे ज्येष्ठ नेते राजेश सावंत यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन; CM फडणवीसांनी व्यक्त केले दुःख




भाजपचे निष्ठावंत आणि रत्नागिरी जिल्ह्यातील आक्रमक नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ नेते राजेश सावंत यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुर्दैवी निधन झाले आहे. त्यांच्या अकस्मात जाण्याने संपूर्ण रत्नागिरी शहर आणि राजकीय वर्तुळात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राजेश सावंत यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, वैद्यकीय उपचारांना प्रतिसाद देण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. संघटनात्मक वाटचालीत मोठा वाटा राजेश सावंत यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय प्रवासात रत्नागिरी भाजपमध्ये अत्यंत मोलाची भूमिका बजावली होती. कार्यकर्त्यांना सोबत घेऊन चालणारा नेता, आक्रमक वक्तृत्व आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर नेहमी तत्पर राहणारा लोकप्रतिनिधी अशी त्यांची ख्याती होती. पक्षाच्या संघटनात्मक वाढीत त्यांचा मोठा वाटा राहिला आहे. सावंत यांच्या निधनाची वार्ता वाऱ्यासारखी पसरताच राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे. रत्नागिरीतील भाजप कार्यकर्त्यांवर तर दुःखाचा डोंगरच कोसळला आहे. सावंत यांच्या पश्चात मोठा आप्तपरिवार आणि कार्यकर्ता वर्ग असून, त्यांच्या जाण्याने कोकणातील राजकारणातील एक अभ्यासू आणि कार्यतत्पर चेहरा हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. उदय सामंतांचे विश्वासू राजेश सावंत गहे पालकमंत्री उदय सामंत यांचे विश्वासू सहकारी होते. मात्र, अंतर्गत वादामुळे त्यांनी शिवसेनेला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजप जिल्हाध्यक्ष म्हणून नगरपालिका निवडणुकीत त्यांनी मोलाची भूमिका बजावली. मात्र, आरोपामुळे जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देत ते राजकारणापासून दूर होते. फडणवीसांनी व्यक्त केले दुःख सावंत यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला. आपल्या शोक संदेशात ते म्हणतात, ‘भाजपाचे दक्षिण रत्नागिरीचे माजी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. पक्षसंघटना बळकट करण्यासाठी त्यांनी निष्ठेने आणि समर्पित भावनेने कार्य केले. जनतेच्या प्रश्नांप्रती असलेली त्यांची संवेदनशीलता ही त्यांची वेगळी ओळख होती. रत्नागिरी जिल्ह्यात भाजपाची विचारधारा रुजवण्यासाठी आणि संघटना मजबूत करण्यासाठी त्यांनी योगदान दिले. समाजाप्रती बांधिलकी असणारे व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.’



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *