![]()
आम्ही जर लोकप्रतिनिधींना निवडून देणारे आहोत, निवडून येणारे असतो तर आम्हाला हक्काच्या आरक्षणासाठी संघर्ष करण्याची काय गरज होती? असा सवाल करत ओबीसी आंदोलनकर्ते लक्ष्मण हाके यांनी भाजप नेते प्रसाद लाड आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. आमची मते घेऊन राजकारण करायचे, आमचेच शोषण करायचे आणि नंतर आम्हालाच हीन समजायचे, या भावनेमुळे तळपायाची आग मस्तकात जाते. लक्ष्मण हाके म्हणाले की, जनतेच्या टॅक्समधून सरकारी तिजोरीत जाणाऱ्या पैशांपैकी 10 ते 12 टक्के हिस्सा प्रसाद लाड यांच्या कंपन्यांना जातो. खाजगीकरणाच्या माध्यमातून राज्यातील 1 लाख रोजगार कंत्राटी पद्धतीवर देऊन तरुणांचे रक्त पिण्याचे काम सुरू आहे. या कंत्राटी नोकऱ्यांमध्ये आरक्षण दिले जाते का, कर्मचाऱ्यांचे पीएफ आणि पगार वेळेवर दिले जातात का, असा सवाल उपस्थित करत लाड यांनीच तरुणांच्या नोकऱ्या हिरावल्याचा दावा हाके यांनी केला. ‘माधव’ प्रयोगाची आठवण करून देत महायुतीवर टीका मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रसाद लाड यांना सत्ता मिळण्यात ‘माधव’ (माळी, धनगर, वंजारी) प्रयोगाचा आणि ओबीसी समाजाचा मोठा वाटा असल्याचे सांगत हाके म्हणाले, “तुम्ही ओबीसींचे उपकार फेडण्याऐवजी आमच्यावरच टीका करत आहात.” आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलण्याचा विखे पाटलांना कोणताही अधिकार नाही, असे ठणकावून सांगत “आम्हाला गोळ्या घातल्या तरी आता आम्ही शांत बसणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला. जरांगेंच्या मागण्यांवरून सामाजिक न्यायावर प्रश्नचिन्ह मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्यास देशातील आणि राज्यातील सामाजिक न्यायाची चौकट पूर्णपणे उद्ध्वस्त होईल, अशी भीती लक्ष्मण हाके यांनी व्यक्त केली. सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपद आणि फलटण पंचायत समितीचे पद गेल्याचे उदाहरण देत त्यांनी हे सर्व बेकायदेशीर असल्याचा दावा केला. जरांगे सरकारचे बाहुले बनले मी शिवसेना भवनात गेलो म्हणून मनोज जरांगे यांच्या पोटात का दुखते? ते शिवसेना भवन त्यांच्या वडिलांचे कार्यालय आहे का? असा सवाल हाके यांनी उपस्थित केला. तसेच, त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावरही टीका केली. आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांची सध्याची भूमिका योग्य वाटत नसल्याचे हाके म्हणाले, जरी त्यांनी यापूर्वी शिंदे यांना अनेकदा सांभाळून घेतल्याचे नमूद केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाबाबत स्पष्ट आणि अधिकृत भूमिका जाहीर करावी, अशी मागणी लक्ष्मण हाके यांनी केली. आम्हाला कोणी मोजले नाही म्हणून आमचे आंदोलन थांबणार नाही, असेही त्यांनी ठामपणे सांगितले. आरक्षणाच्या नावाखाली राजकारण करणाऱ्यांचा आता पर्दाफाश झाला असून, समाजाला सत्य समजू लागले आहे, असा दावा हाके यांनी केला.
हे ही वृत्त वाचा सुनील तटकरेंचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात?:उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना प्रशांत किशोर यांचा थेट अल्टीमेटम, राष्ट्रवादीत नव्या चर्चांना उधाण
अजित पवार यांच्या विमान अपघातातील दुर्दैवी निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची (NCP) धुरा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे आली आहे. आता आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षात मोठ्या संघटनात्मक बदलांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. प्रसिद्ध निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी नुकतीच मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. सूत्रांच्या माहितीनुसार, या बैठकीत त्यांनी विद्यमान प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली असून, “जर भविष्यात रणनीतीकार म्हणून माझ्यासोबत काम करायचे असेल, तर प्रदेशाध्यक्षपदाबाबत ठोस निर्णय घ्यावा लागेल,” असा थेट सल्ला दिला आहे. वाचा सविस्तर
Source link