Headlines

मराठवाड्याच्या रखडलेल्या विकासकामांचा आढावा घ्या:अंबादास दानवेंची मुख्यमंत्र्यांकडे उच्चस्तरीय बैठकीची मागणी




छत्रपती संभाजीनगर येथे १६ सप्टेंबर २०२३ रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या विशेष बैठकीत मराठवाड्यासाठी अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या होत्या. मात्र, या निर्णयांच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीबाबत अद्यापही प्रश्नचिन्ह असल्याने विधान परिषदेचे आमदार अंबादास दानवे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. गुरुवारी (६ ऑगस्ट २०२६) दानवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत त्यांना एक सविस्तर निवेदन दिले. या निवेदनाद्वारे त्यांनी प्रलंबित निर्णयांच्या सद्यस्थितीचा तातडीने आढावा घेण्यासाठी ‘उच्चस्तरीय बैठक’ बोलावण्याची प्रमुख मागणी केली आहे. प्रलंबित प्रकल्पांवर लक्ष केंद्रित करण्याची मागणी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठवाड्याच्या प्रादेशिक विकासाशी आणि शेतीशी निगडित अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले होते. यामध्ये प्रामुख्याने ‘मराठवाडा वॉटरग्रीड’, ‘नदी जोड प्रकल्प’, विविध सिंचन प्रकल्प, उच्च पातळीवरील बंधारे आणि मध्यम प्रकल्पांचा समावेश होता. मात्र, मंत्रिमंडळाने मंजूर केलेल्या या घोषणांची आणि निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी अद्यापही प्रलंबित असल्याचे दानवे यांनी निदर्शनास आणून दिले. या सर्व प्रकल्पांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घ्यावा आणि संबंधित विभागांना कामे गतीने मार्गी लावण्यासाठी स्पष्ट निर्देश द्यावेत, अशी आग्रही मागणी दानवे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. ‘१७ सप्टेंबरपूर्वी प्रगती अहवाल जनतेसमोर मांडा’ येत्या १७ सप्टेंबर रोजी ‘मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन’ साजरा केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर अंबादास दानवे यांनी सरकारला एक महत्त्वाची सूचना केली आहे. १७ सप्टेंबरच्या आधीच संबंधित सर्व विभागांची एक संयुक्त उच्चस्तरीय बैठक आयोजित करावी आणि मराठवाड्यासाठी घेतलेल्या प्रत्येक निर्णयाच्या अंमलबजावणीचा स्पष्ट अहवाल जनतेसमोर सादर करावा, अशी मागणी दानवे यांनी केली आहे. हेही वाचा.. बंगळुरूत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे 11वे अधिवेशन: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मोठे आश्वासन- जातीय जनगणनेत ओबीसी कॉलमचा समावेश करणार राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने बंगळुरू येथे आयोजित करण्यात आलेल्या 11व्या राष्ट्रीय अधिवेशनात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी समाजाला एक मोठे आणि महत्त्वपूर्ण आश्वासन दिले आहे. आगामी जातीय जनगणनेमध्ये ‘ओबीसी’ समाजासाठी स्वतंत्र कॉलमचा समावेश केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. या अधिवेशनाला फडणवीस प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नाहीत, मात्र त्यांनी एका विशेष व्हिडीओ संदेशाद्वारे अधिवेशनाला आणि ओबीसी बांधवांना संबोधित केले. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *