![]()
तुमच्या आधार कार्डच्या आधारे दहशतवाद्यांनी बँकेत खाते काढले आहे. त्याद्वारे आर्थिक व्यवहार झाल्याची केस नोंद झाली, अशीभीती दाखवत, निवृत्त प्राध्यापक दांपत्याला बदमाशांनी डिजिटल अरेस्ट केले. तसेच वेगवेगळ्या चार खात्यांतून मिळून १ कोटी ११ हजाररुपये घेत फसवणूक केली. ही घटना परभणी शहरातील समाधाननगरभागात घडली. या प्रकरणी नवा मोंढापोलिस ठाण्यात पाच ते सहाअज्ञातांवर गुन्हा दाखल झाला. फिर्यादी कृषी महाविद्यालयातप्राध्यापक होते. त्यांच्या पत्नीहीप्राध्यापक पदावरून निवृत्त झाल्याआहेत. १६ जून रोजी सकाळी त्यांनाव्हिडिओ कॉल आला. तुमचे आधारकार्ड दहशतवाद्यांकडे मिळाले आहे.त्यामुळे तुमच्याविरुद्ध गुन्हा नोंदझाला आहे, असे बोलून वरिष्ठांशीबोला म्हणत संशयिताने फोन दुसऱ्याव्यक्तीकडे दिला. त्या व्यक्तीनेतुम्हाला हाऊस अरेस्ट केले जातआहे, असे सांगितले. दुसऱ्या दिवशीपुन्हा त्यांना फोन आला. तुमच्याजवळील सर्व पैसे एकाच खात्यावरजमा करा, असे सांगून सर्व रक्कमएका खात्यावर जमा करुन घेतली.नंतर आरटीजीएस व इतर मार्गानेरक्कम दुसऱ्या खात्यावर वळवली.अशाप्रकारे फसवणुकीचा प्रकारघडला. फसवणूक झाल्याचे लक्षातयेताच निवृत्त प्राध्यापक दांपत्यानेनवा मोंढा पोलिस ठाण्यात धावघेतली. या गुन्ह्याचा पुढील तपासपोलिस करत आहेत. असा उघडकीस आला प्रकार ३० दिवसांत तुमची रक्कम परत जमाहोईल, असे संशयितांनी सांगितलेहोते. मात्र रक्कम परत आली नाही.फिर्यादी दाम्पत्याने फोन केलाअसता त्यांचा नंबर लागला नाही.फसवणुकीचा हा प्रकार १६ जूनसकाळी ९ ते २९ जुलैच्या सकाळी११ या वेळेत घडला. एकूण १ कोटी११ हजार रुपयांची फसवणूकझाल्याचे पोलिसांत नमूद आहे. दिव्य मराठी नॉलेज: १९३० वर कॉल करा फोनवर बँक खात्याची माहिती,डेबिट/क्रेडिट कार्डचे तपशील वओटीपी शेअर करू नका, फसवणूकझाल्यास राष्ट्रीय सायबर क्राइमहेल्पलाइन १९३० वर तात्काळ संपर्कसाधा किंवा cybercrime.gov.inया अधिकृत संकेतस्थळावर तक्रारनोंदवा. जवळचे पोलिस ठाणे गाठा.
Source link
परभणीत निवृत्त प्राध्यापक दांपत्यालाडिजिटल अरेस्ट करून 1 कोटीचा गंडा:आधार कार्डवर अतिरेक्यांनी बँक खाते काढल्याची भीती संशयितांनी दाखवली