Headlines

हिमाचलमध्ये प्रवाशांनी भरलेली बस पलटली, 7 जणांचा मृत्यू:50 मीटर खाली दुसऱ्या रस्त्यावर कोसळली, आत अडकलेले लोक एकमेकांवर पडले




हिमाचल प्रदेशातील चंबा येथे शनिवारी सकाळी एक खासगी बस उलटली. यात 7 लोकांचा मृत्यू झाला. यात एक तरुणी, 2 महिला आणि चार पुरुषांचा समावेश आहे. तर 11 प्रवासी जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांना तीसा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. एसपी विजय कुमार सकलानी यांनी सांगितले की, बस सकाळी 7 वाजता बैरागढहून चंबासाठी निघाली होती. बैरागढपासून काही अंतरावर ‘शर्मा कोच’ बस चालुंज वळणावर अनियंत्रित होऊन उलटली आणि दुसऱ्या रस्त्यावर जाऊन पडली. प्रत्यक्षदर्शींच्या मते- बस उलटताच घटनास्थळी आरडाओरडा सुरू झाला. आत अडकलेले लोक एकमेकांवर पडले. जेसीबीच्या मदतीने बस बाजूला करण्यात आली, त्यानंतर आत अडकलेल्या मृत आणि जखमींना बाहेर काढण्यात आले. अपघातानंतरचे 2 फोटो.. सुमारे 25 प्रवासी होते प्राथमिक माहितीनुसार- बसमध्ये सुमारे 25 प्रवासी होते. अति दुर्गम भागामुळे प्रशासन संपर्क साधू शकत नाहीये. त्यामुळे मृतांचा आणि जखमींचा नेमका आकडा येण्यास वेळ लागत आहे. प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी पोहोचल्यानंतर आणि चौकशी पूर्ण झाल्यानंतरच या अपघातातील जीवित आणि वित्तहानीची नेमकी स्थिती स्पष्ट होईल. मृतांची संख्या अजून वाढण्याची शक्यता आहे. अपघातात या लोकांचा मृत्यू झाला



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *