![]()
राज्याचे महसूल अपर मुख्य सचिव विकास खारगे यांची भ्रष्टाचार निर्मूलन समितीने भेट घेऊन निवेदन सादर केले. जिल्ह्यातील महसूल सेवामध्ये प्रचंड प्रमाणात विलंब होत असून, संबंधित नागरिकांना नाहक त्रास दिल्या जातो, असा आरोप करीत समितीने समस्यांचा पाढाच वाचला. अपर मुख्य सचिव खारगे यांनी अकोल्यात जिल्हाधिकारी कार्यालयासह अन्य कार्यालयांशी पाहणी करीत नागरिकांशी संवाद साधला. त्यावेळी समितीनेही अपर मुख्य सचिव खारगे यांची भेट घेतली. राज्याचे महसूल अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी जिल्ह्याचा दौरा केला. राज्य त्यांनी .जिल्हाधिकारी कार्यालयात विभाग प्रमुखांचा आढावा घेतला. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील सह.निबंधक कार्यालय, भूमी अभिलेख कार्यालयातील विविध ऑनलाइन सुविधांचा आढावा घेत नागरिकांशी संवाद साधला. दरम्यान खारगे यांना भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले जिल्हाध्यक्ष एम के दिवनाले यांनी निवेदन देत त्यांंच्या चर्चा केली. खारगे यांच्यासोबत विभागीय आयुक्त अमरावती नयना गुंडे, जिल्हाधिकारी वर्षा मिना, अकोला उपविभागीय अधिकारी शरद जावळे, तहसीलदार कुणाल झाल्टे आदी होते. समितीने नागरिकांंंना येत असलेल्या अडचणींची अधिकाऱ्यांना माहिती दिली. निवेदन देताना समितीचे जिल्हाध्यक्ष एम. के. दिवनाले, अॅड. कांचन शिंदे, अॅड. चंद्रकांत वानखडे, अॅड. प्रणव मार्के पाटील, अॅड. अभय गौतम, सुरेश संतानी, अॅड. सुनीता गवई, अॅड. वर्षा सदार, अॅड. अमोल भोसले, अॅड.अभिषेक गौतम, अॅड. ओम मते, अॅड. चैताली बुंदेले, अॅड. दिपाली जानोरकर, अॅड. वैभवी काळदाते, अॅड. आकाश गाडगे, अॅड. लवेश गुरबानी, अॅड. अजय भारसाकळे, अॅड. सायली लोंदे, अॅड. शुभम कर्डीले, मंगेश कराळे, हरीश परवानी, राहुल संतानी, सुदर्शन कावना आदी होते. ऑक्सिजन पार्क येथे वृक्षारोपण उत्साहात अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी कापशी तलाव परिसर व पांदण रस्त्याची पाहणी करीत स्वयंभू गणेश मंदिरात दर्शन घेतले. खारगे व मान्यवरांच्या उपस्थितीत कापसी तलाव परिसरातील ऑक्सिजन पार्क येथे वृक्षारोपण करण्यात आले.गावे एकत्रित असली की विकासाच्या दृष्टीने वाटचाल होते असे प्रतिपादन यावेळी खारगे यांनी केले. समितीने कारभाराचा वाचला पाढा जिल्ह्यातील महसूल सेवा मध्ये प्रचंड प्रमाणात विलंब व नाहक त्रास दिल्या जात असल्याचा आरोप भ्रष्टाचार निर्मूलन समितीने केला. उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात नागरिकांचे फेरफार संबंधीचे नमुना बनवणे अर्ज बऱ्याच दिवस प्रलंबित ठेवण्यात येतात. सामान्य नागरिकांना विनाकारण त्रास दिल्या जाते, असे समितीचे पदाधिकारी म्हणाले.
Source link
भ्रष्टाचार निर्मूलन समितीचा आराेप:महसूल सेवामध्ये प्रचंड विलंब; नागरिकांना देतात नाहक त्रास, अप्पर मुख्य सचिवांना दिले निवेदन