![]()
राज्यात पावसाचा जोर ओसरेल असा अंदाज वर्तवला जात असतानाच, भारतीय हवामान विभागाने मात्र एका मोठ्या संकटाचा इशारा दिला आहे. राज्यात पुन्हा एकदा पावसाला अत्यंत पोषक वातावरण निर्माण झाले असून, विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी ताशी ७० ते ७५ किलोमीटर वेगाने वारे वाहण्यासह गारपीट होण्याचा मोठा धोका असल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे. पावसाला पोषक वातावरण कसे निर्माण झाले? हवामान खात्याच्या माहितीनुसार, सध्या राजस्थानच्या अनुपगढपासून ते थेट दिल्ली आणि पश्चिम बंगालच्या उपसागरापर्यंत एक कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. याव्यतिरिक्त, मध्य बंगालच्या उपसागरात समुद्रसपाटीपासून सुमारे ३.१ किलोमीटर उंचीवर आणखी एक प्रणाली सक्रिय झाली आहे. या हवामानीय बदलांमुळेच पावसाचा जोर अचानक वाढला आहे. महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट हवामान विभागाने राज्यातील अनेक जिल्ह्यांना वादळी पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. यामध्ये प्रामुख्याने खालील जिल्ह्यांचा समावेश आहे: मराठवाडा: छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर आणि धाराशिव. इतर भाग: जळगाव, नाशिक, अहिल्यानगर (अहमदनगर), नागपूर आणि गोंदिया. या भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस हजेरी लावू शकतो. शेती पिकांना गारपिटीचा मोठा फटका बसण्याची शक्यता या बदलत्या हवामानाचा सर्वाधिक फटका शेतीला बसण्याची शक्यता आहे. काही भागांमध्ये ताशी 50 ते 60 किमी, तर काही ठिकाणी चक्क 70 ते 75 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. एवढ्या वेगवान वाऱ्यांमुळे मोठी झाडे उन्मळून पडण्याचा आणि फळबागांचे नुकसान होण्याचा धोका आहे. त्यातच गारपिटीचा इशारा देण्यात आल्याने, हाती आलेल्या पिकांचे अतोनात नुकसान होऊ शकते. देशभरातील 15 राज्यांत हाहाकार केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर देशभरात पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश आणि बिहारसह देशातील तब्बल १५ राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा आणि वादळाचा इशारा देण्यात आला आहे. देशाची राजधानी दिल्लीत तर गेल्या दोन दिवसांपासून पावसाने जनजीवन विस्कळीत केले आहे. छत्रपती संभाजीनगरसाठी दिलासादायक बातमी: जायकवाडीचे 8 दरवाजे उघडले! एकीकडे वादळी पावसाचे संकट असताना, मराठवाड्यासाठी मात्र एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. मराठवाड्यात प्रत्यक्ष पावसाची नोंद कमी असली, तरी नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत झालेल्या दमदार पावसामुळे गोदावरीचे खोरे दुथडी भरून वाहत आहे. यामुळे मराठवाड्याची तहान भागवणारे ‘जायकवाडी धरण’ आता शंभरीकडे वाटचाल करत आहे. धरणातील पाण्याची आवक प्रचंड वाढल्याने जायकवाडीचे तब्बल 8 दरवाजे अर्ध्या फुटाने उघडून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. हेही वाचा.. दिल्लीत 8 दिवसांत महिन्याभराएवढा पाऊस: राजस्थान-MP मध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा, पाऊस-भूस्खलनामुळे अमरनाथ यात्रा थांबली
दिल्लीत सलग चार दिवसांपासून पाऊस पडत आहे. 8 ऑगस्ट हा दिवस गेल्या दोन वर्षांतील ऑगस्ट महिन्यातील सर्वाधिक पावसाचा दिवस ठरला. शनिवारी दिल्लीत 98.7 मिमी पावसाची नोंद झाली. यापूर्वी ऑगस्टमध्ये इतका जास्त पाऊस 2024 मध्ये झाला होता. तेव्हा महिन्याच्या पहिल्याच दिवशी 100.6 मिमी पावसाची नोंद झाली होती. दिल्लीत या वर्षी ऑगस्टमध्ये एकूण पाऊस 225.7 मिमी झाला आहे. तर ऑगस्टमध्ये सामान्यतः संपूर्ण महिन्यात 233.1 मिमी पाऊस पडतो. म्हणजेच, यावेळी 8 दिवसांतच सामान्य मासिक पावसाचा आकडा जवळपास पूर्ण झाला आहे. सविस्तर वाचा
Source link
राज्यात गारपिटीसह वादळी पावसाचा इशारा:ताशी 75 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता; जायकवाडी धरण भरले, 8 दरवाजे उघडले