Headlines

कोपरगाव शहरातील रस्ते, कब्रस्तानासाठी 1.30 कोटी:आमदार आशुतोष काळे यांची माहिती‎




कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांसाठी सुमारे १ कोटी ३० लाख रुपयांच्या कामांच्या निविदा प्रसिद्ध झाल्या आहेत. यामध्ये रस्ते मजबुतीकरण, काँक्रीटीकरण, सांस्कृतिक सभागृह तसेच कब्रस्तान विकासाच्या कामांचा समावेश आहे. ही माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली. माहेगाव देशमुख येथील ६ चारी रस्ता ते भिकनभाई सय्यद वस्ती (ग्रामीण मार्ग क्र. २१) रस्ता मजबुतीकरणासाठी ४० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. कोळगाव थडी येथील ग्रामीण मार्ग क्र. २९ ते इब्राहिम शेख वस्ती रस्ता काँक्रीटीकरणासाठी ३५ लाख रुपये तर वेस येथील मुस्लिम मोहल्ल्यात सांस्कृतिक सभागृहासाठी २० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. चितळी येथील कब्रस्तान संरक्षक भिंतीसाठी २० लाख रुपये, तर रवंदे येथील कब्रस्तान सुशोभीकरण व सी.डी. वर्कसाठी १५.५० लाख रुपये मंजूर झाले आहेत. या सर्व कामांच्या निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. निविदा प्रसिद्ध झाल्याने संबंधित कामांना लवकरच सुरुवात होण्याची शक्यता आहे. रस्ते आणि सार्वजनिक सुविधांबरोबरच सामाजिक व धार्मिक स्थळांच्या विकासाला यामुळे चालना मिळणार आहे. संबंधित गावांमधील नागरिकांच्या दैनंदिन अडचणी कमी होण्यास मदत होईल, असा दावा करण्यात आला आहे. मतदारसंघातील प्रत्येक गावाचा सर्वांगीण विकास हेच आपले ध्येय असून नागरिकांना दर्जेदार पायाभूत सुविधा मिळाव्यात यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. विकासकामांसाठी निधी आणण्याची प्रक्रिया यापुढेही वेगाने सुरू राहील, असे आमदार आशुतोष काळे यांनी सांगितले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *