![]()
शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा वाद सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुक्रवारी शिवसेनेच्या (शिंदे) बंडखोरांची भेट घेतली. त्यांना ‘भिऊ नका, मी तुमच्या पाठीशी आहे’ असे म्हटले. न्यायालयावर दबाव आणण्यासाठीच मोदींनी ‘भिऊ नको’चा संदेश दिल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत केला. ते म्हणाले, कायदेशीर लढाई सुरू असताना देशाच्या प्रमुखांनी अशा प्रकारे राजकीय अभय देणे लोकशाहीच्या आणि न्यायव्यवस्थेच्या परंपरेला धरून आहे का? “कोरोना काळातील माझ्या फेसबुक लाइव्हवर टीका होते. आता मोदी तरुणांना प्रत्यक्ष भेटण्याऐवजी सोशल मीडियाचा वापर करत आहेत, मग आता काय इन्स्टाग्रामवरून देश चालवण्याची वेळ आली आहे का?” भेटीचा मुद्दा सुनावणीत आणण्याची तयारी सूत्रांनी सांगितले की, बंडखोरांशी मोदींच्या भेटीचा मुद्दा कोर्टासमोर सुनावणीत आणला तर आपली बाजू अधिक भक्कम होईल, असा सल्ला काही जणांनी उद्धव ठाकरेंना दिला. त्यानुसार त्यांनी तातडीने पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका रेकॉर्डवर आणली आहे. दरम्यान, उद्धव यांच्या आरोपावर शिवसेना खासदार ज्योती वाघमारे म्हणाल्या की, शिंदे हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून एका पक्षाचे नेते आहेत. राज्याच्या विकासाचे प्रलंबित प्रश्न घेऊन पंतप्रधानांना भेटायचे नाही का ? ठाकरेंचा न्यायव्यवस्थेवर विश्वास नाही का? दिव्य मराठी इनसाइड स्टोरी आणि न्यायव्यवस्थेच्या परंपरेला धरून आहे का? “कोरोना काळातील माझ्या फेसबुक लाइव्हवर टीका होते. आता मोदी तरुणांना प्रत्यक्ष भेटण्याऐवजी सोशल मीडियाचा वापर करत आहेत, मग आता काय इन्स्टाग्रामवरून देश चालवण्याची वेळ आली आहे का?”
Source link
सुप्रीम कोर्टावर दबावासाठीच मोदींचा बंडखोरांना ‘भिऊ नका’ संदेश- उद्धव:सहा फुटीर खासदार दिल्लीत पंतप्रधानांना भेटल्याने संताप