![]()
सुप्रिया सुळे पहिल्यांदाच ८ खासदारांना एकत्र घेऊन सोमवारी (१० आॅगस्ट) दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणार आहेत. राज्यातील पाणीटंचाई, शेतकरी कर्जमाफी, विद्यार्थी प्रश्नांसाठी आम्ही लपूनछपून नव्हे तर उघडपणाने ही भेट घेणार आहोत, असे सुळे म्हणाल्या.
.
‘एफसीआरए’ विधेयकावर सुळे म्हणाल्या की, ड्रग्ज किंवा बेकायदेशीर पैशांचा प्रवाह रोखण्यास आमचा पूर्ण पाठिंबा आहे; मात्र सर्वच संस्थांकडे संशयाने पाहणे अयोग्य आहे. शेतकरी कर्जमाफीत जाचक अटी लावून दुसरीकडे ‘लाडकी बहीण’ योजनेला सवलती देणे हा सरकारचा केवळ निवडणुकीपुरता स्टंट असल्याची टीकाही त्यांनी केली.
१५ दिवसांमध्ये तिनदा मोदी-शाहांसोबत चर्चा
१५ जुलै : सुप्रिया सुळेंनी अमित शाहांची भेट घेऊन ‘डिलिमिटेशन’ बाबत दाक्षिणात्य व प्रादेशिक राज्यांची बाजू मांडली. २२ जुलै : शरद पवार आणि सुप्रियांनी मोदींची भेट घेऊन राज्यातील कृषी व सिंचन प्रश्नांवर चर्चा केली. २७ जुलै : सुप्रियांनी पुन्हा गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली.