![]()
बारामतीमध्ये पुन्हा एकदा विमान कोसळल्याची मोठी घटना समोर आली आहे. येथे एक प्रशिक्षण विमान दुर्घटनाग्रस्त झाले असून, या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली आहे. या विमानात नेमके किती जण होते आणि आत असलेल्या प्रवाशांची सध्याची स्थिती काय आहे, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती हाती आलेली नाही. दरम्यान, या अपघातग्रस्त विमानाचा आणि घटनास्थळाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया विमान कोसळण्याच्या या घटनेवर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, अशा घटना वारंवार घडत आहेत. यामागे नेमका तांत्रिक बिघाड आहे की आणखी काही कारण आहे, याचा सरकार नक्कीच गांभीर्याने विचार करेल आणि चौकशी करेल. यासोबतच, प्रवाशांनीही अशा प्रवासात काळजी घेतली पाहिजे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. हे वृत्त अपडेट होत आहे..
Source link
बारामतीत पुन्हा विमान कोसळले:बचावकार्य सुरू, कारण अद्याप अस्पष्ट