Headlines

नाशिकला 4.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का:21 जुलैपासून 20 धक्के, शनिवारी तीव्रता जास्त, भूकंपाची खोली 5 किमी




नाशिक शहरासह जिल्ह्यात शनिवारी रात्री १० वाजता ४.३ रिश्टर तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के जाणवले. नाशिक, चांदवड आणि देवळ्यात हे सौम्य धक्के होते तर पेठ, दिंडोरी आणि कळवणला मध्यम जाणवले. भूकंपाची खोली ५ किमी असून केंद्रबिंदू २०.४२४ उत्तर अक्षांश आणि ७३.६८२ पूर्व रेखांशावर आहे. हा परिसर सुरगाणा तालुक्याच्या आसपास आहे. यापूर्वीही २१ जुलैपासून नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा, दिंडोरी आणि लगतच्या परिसराला भूकंपाचे सौम्य धक्के बसले आहेत. ६ ऑगस्टला १२ तासांत ६ भूकंप झाले होते. दरम्यान, राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्रातर्फे सुरगाणा तहसील कार्यालयात अत्याधुनिक ब्रॉडबँड सिस्मोग्राफ कार्यान्वित केला आहे. या यंत्रणेत नोंदवल्या जाणाऱ्या भूकंपीय हालचालींची माहिती रिअल-टाईम स्वरूपात थेट नवी दिल्लीतील एनसीएसच्या केंद्रीय नियंत्रण कक्षाला पाठवली जाणार आहे. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राची अत्याधुनिक भूकंपमापन यंत्रणा आपत्ती व्यवस्थापन क्षमतेला बळकटी देईल, असे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले. वारंवार धक्क्यांची कारणे 1. महाराष्ट्र गुजरातच्या सीमावर्ती भागात बेसॉल्ट खडकांच्या थरांतील घर्षणामुळे भूकंप येत आहे.
2. १७ जुलैला नाशिकमध्ये २४ तासांत १६४ मिमी पाऊस पडला. ते पाणी भेगांमधून खोलवर झिरपले.
३. या दाबामुळे भूगर्भात ५ किमी खाली स्प्रींगसारखा ताण येत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *