Headlines

‘ड्रॅगन’ची गोड क्रांती; निंभोरेचा प्रयोग इतर शेतकऱ्यांसाठी ठरतोय दिशादर्शक:100 एकरांवर ड्रॅगन फ्रूटची लागवड; कमी पाण्यात विक्रमी उत्पादन



दुष्काळी भागातही आधुनिक तंत्रज्ञान, नियोजनबद्ध व्यवस्थापन आणि बाजारपेठेचा अचूक अभ्यास यांच्या बळावर शेती फायदेशीर ठरू शकते, याचे प्रेरणादायी उदाहरण करमाळा तालुक्यातील निंभोरे गावाने घालून दिले आहे. पाण्याची टंचाई कायम भेडसावणाऱ्या या गावात आज तब्बल १

.

निंभोरे येथील युवा शेतकरी हरीभाऊ दळवे यांनी २०२२ मध्ये एका हेक्टर क्षेत्रावर ड्रॅगन फ्रूटची लागवड केली. सुरुवातीपासून ठिबक सिंचन, शास्त्रीय पद्धतीने ^पाण्याअभावी ऊसासारखी नगदी पिके घेता येत नव्हती. ड्रॅगन फ्रूट हे कमी पाण्यात अधिक उत्पादन देणारे पीक असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुजरात, कर्नाटक आणि महाराष्ट्रातील विविध ठिकाणी जाऊन या शेतीचा अभ्यास केला. त्यानंतर ९ टन मालाच्या विक्रीतून सुमारे ५ लाख ८० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. बागेत अजूनही मोठ्या प्रमाणात फळे असून दिवाळीपर्यंत एकूण सुमारे ४० टन उत्पादन अपेक्षित आहे. त्यातून सुमारे २५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा आहे. – हरीभाऊ दळवे, निंभोरे (ता. करमाळा) कमी पाण्यात अधिक उत्पादन देणारे ड्रॅगन फ्रूट हे भविष्यातील महत्त्वाचे फळपीक आहे. अशा आधुनिक शेतीला कृषी विभागाकडून प्रोत्साहन दिले जाईल. – राजेंद्र नेटके, तालुका कृषी अधिकारी, करमाळा खत व पाणी व्यवस्थापन आणि वेळोवेळी पीकनियोजन यावर भर दिल्यामुळे त्यांच्या बागेचा तिसरा बहार सध्या जोमात सुरू आहे. यंदा आतापर्यंत सुमारे ७ टन फळांची विक्री झाली असून, आणखी २ ते २.५ टन उत्पादन मिळण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे एका हेक्टरमधून सुमारे ९ ते ९.५ टन उत्पादनाची नोंद होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. ड्रॅगन फ्रूटला स्थानिक तसेच बाहेरील बाजारपेठेत सातत्याने मागणी मिळत आहे. या फळाला प्रति किलो १२० रुपये दर मिळाला होता. सध्या बाजारभाव ५३ ते ५४ रुपयांवर आला असला, भरघोस उत्पादनामुळे शेतकऱ्यांचे एकूण उत्पन्न समाधानकारक राहिले आहे.

एक हेक्टरमधून ५ लाख ८० हजारांचे उत्पन्न

कमी पाण्यात अधिक उत्पादन



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *