Headlines

माहीममध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार:फोटो-व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी, अल्पवयीन आरोपी बालसुधारगृहात, साथीदाराचा शोध सुरू




माहीम परिसरात शाळा सुटल्यानंतर घरी जात असलेल्या एका अल्पवयीन मुलीला बाईकवरून निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आरोपीने या विकृत कृत्याचे अश्लील फोटो व व्हिडिओ काढून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत पीडितेला गप्प राहण्यास भाग पाडले होते. याप्रकरणी माहीम पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले असून त्याची रवानगी डोंगरी येथील बालसुधारगृहात करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी माहीम परिसरातील एका नामांकित शाळेत शिक्षण घेत आहे. 18 जून रोजी शाळा सुटल्यानंतर ती घरी जात असताना आरोपी बाईकवरून तिच्याजवळ आला आणि तिला एका निर्जनस्थळी घेऊन गेला. तेथे तिचे हातपाय बांधून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले. यानंतर आरोपीने तिचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ काढून ते व्हायरल करण्याची धमकी दिली. या भीतीपोटी घाबरलेल्या मुलीने सुरुवातीला हा प्रकार कोणालाही सांगितला नाही. पालकांच्या सतर्कतेमुळे गुन्हा उघडकीस घटनेनंतर मुलगी प्रचंड मानसिक तणावात होती. तिच्या वर्तनातील बदल पालकांच्या लक्षात येताच त्यांनी आपुलकीने चौकशी केली असता, मुलीने घडलेला प्रकार सांगितला. पालकांनी तत्काळ माहीम पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी तक्रारीची गंभीर दखल घेत लैंगिक अत्याचार आणि ‘पॉक्सो’ कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले आणि डोंगरी बालसुधारगृहात पाठवले. या गुन्ह्यात आणखी एका तरुणाचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. पीडिता आणि आरोपीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. या घटनेमुळे माहीम परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

हे ही वृत्त वाचा

अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या 22 वर्षीय नराधमाला अटक:गेल्या 4 वर्षांपासून सुरू होता घृणास्पद प्रकार; व्हिडिओ काढून पीडितांना करायचा ब्लॅकमेल
नंदुरबारमध्ये अल्पवयीन बालके आणि युवकांचे लैंगिक शोषण करणाऱ्या एका नराधमाला पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली आहे. हा संशयित आरोपी गेल्या चार वर्षांपासून पैशांचे आमिष दाखवून आणि ब्लॅकमेल करून हे घृणास्पद कृत्य करत असल्याचे तपासात उघड झाले आहे. 6 ऑगस्ट रोजी संशयिताने भोणे फाटा परिसरातील पपईच्या शेतात एका अल्पवयीन मुलाला आमिष दाखवून बोलावले होते, जिथे त्याच्यावर लैंगिक अत्याचार होणार असल्याची गुप्त माहिती पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांना मिळाली होती. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *