Headlines

मोहोळ तालुक्यामध्ये ‘प्रिसिजन पासवर्ड वाचन’चा श्रीगणेशा:पाच शाळांतील विद्यार्थ्यांना मासिकांचे वाटप; कार्यशाळेतून शब्दसंपत्ती वाढविण्याचे केले मार्गदर्शन‎



‘वाचाल तर शिकाल, वाचाल तर वाढाल आणि वाचाल तरच टिकाल’ हा प्रेरणादायी संदेश देत ‘प्रिसिजन पासवर्ड वाचन’ अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याला उत्साहात सुरुवात झाली आहे. प्रिसिजन फाउंडेशन आणि युनिक फिचर्स, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या या अ

.

या अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना ‘पासवर्ड’ मासिकाचे अंक वितरित करून वाचनाचे महत्त्व, वाचनाचे फायदे, वेळेचा सदुपयोग तसेच शब्दसंपत्ती वाढविण्याचे विविध मार्ग याबाबत मार्गदर्शन केले जात आहे. गतवर्षी अभियानाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून आता दुसऱ्या टप्प्याला प्रारंभ झाला आहे. दुसऱ्या टप्प्याच्या पहिल्या आजच्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) युगात तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून ज्ञान मिळवणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच वाचन आणि पाठांतर यांचे महत्त्वही मोठे आहे. वाचन माणसाला नेहमी काही ना काही नवीन देत असते. कधी अनुभव, कधी निसर्गाची ओढ, तर कधी दैनंदिन जीवनातील छोट्या-छोट्या गोष्टींकडे पाहण्याची नवी दृष्टी. परंतु आजच्या ‘डिजिटल स्क्रिन’च्या जीवनात वाचनासाठी वेळ दिला जात नाही. ग्रामीण भागातील मुलांत वाचन संस्कृती रुजावी या दृष्टीने प्रिसिजन फाउंडेशन व युनिक फिचर्स यांनी सुरू केलेला हा वाचन पासवर्ड अभियान हा उपक्रम कौतुकास्पद आहे. – रवी चव्हाण, उपक्रमशील शिक्षक, चिखली वर्षाच्या पहिल्या सत्रात इयत्ता चौथी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मासिकांचे वाटप करण्यात येत आहे. मोहोळ तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिखली, वरकुटे वस्ती, सय्यद वरवडे, दाजीकाका गोडबोले शाळा कामती आणि इनोव्हेटिव्ह स्कूल अंकोली या पाचशाळांचा अभियानात समावेश आहे. या अभियानांतर्गत शनिवारी (दि. ८) चिखली, ता. मोहोळ येथील शाळेत सुमारे ८० विद्यार्थ्यांना ‘प्रिसिजन पासवर्ड’ मासिकाचे वाटप करण्यात आले. आली. तसेच काही शब्द लिहून घेण्याचा उपक्रमही घेण्यात आला. या स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात येणार आहेत. चिखली येथील वाचन कार्यशाळेस जनसंपर्क अधिकारी माधव देशपांडे, नितीन फलटणकर आणि वैशाली बनसोडे उपस्थित होते. त्यांनीही विद्यार्थ्यांशी संवाद साधत वाचनाचे महत्त्व पटवून दिले. हा उपक्रम प्रिसिजनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे.

‘वाचन पासवर्ड अभियान’ नक्कीच कौतुकास्पद उपक्रम



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *