Headlines

अवैध, ओव्हरलोड वाहतुकीचा मुद्दा ऐरणीवर; नागरिकांत संताप:अपघातात मृत महिलांचे कुटुंबीय जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात‎



राजापेठ उड्डाणपुलावर ‘नो एंट्री’ च्या वेळात धावणाऱ्या विना नंबर, विना पासिंगच्या ट्रकने दोन महिलांचा बळी घेतल्याच्या घटनेमुळे संताप व्यक्त होत आहे. या अपघाताच्या पार्श्वभूमीवर शहरातील बिघडलेल्या वाहतूक व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत भ्रष्ट वाहतूक

.

२८ जुलैला राजापेठ उड्डाणपुलावर झालेल्या अपघातात बोरगाव धर्माळे, अमरावतीच्या भटवाडी येथील रहिवासी दोन्ही महिलांचा जागीच मृत्यू झाला होता. त्यानंतर प्रशासनाने जड वाहनास शहरात वाहतूक बंदी केली. परंतु काही दिवसानंतर त्यात विशिष्ट वाहनांना मुभा दिल्याचेही स्पष्ट केले. मात्र प्रशासनाने दिलेली मुभा सर्वांसाठीच आहे, असे समजून आजही शहरात जड वाहने धावत आहेत. त्यामुळे पुन्हा अपघाताची भीती आहे. परिणामी अशा वाहनांवर किमान बंदीच्या वेळात बंदी घालावी, अशी मागणी यावेळी केली. दरम्यान वेलकम पॉइंट येथे खासगी बसचालक मुख्य रस्त्यावरच बस उभ्या करतात, ज्यामुळे दररोज भीषण ट्रॅफिक जाम होऊन अपघातांना आमंत्रण मिळत आहे. वारंवार निवेदने देऊनही पोलिस, आरटीओ कारवाई करत नाहीत, असा अनुभव असल्याचेही यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले.

शहरात ठिकठिकाणी २०० रुपयांत मिळणारे हलक्या दर्जाचे हेल्मेट विकले जात आहेत. नागरिकांच्या जिवाशी खेळ करणाऱ्या अशा बनावट हेल्मेट विक्रेत्यांवर बंदी घालून कारवाई करावी अपघातात मृत महिलाच्या कुटुंबीयांना शासनातर्फे ठोस मदत द्यावी, अशी मागणीही यावेळी केली. या वेळी गोपाल धर्माळे, किशोर बोरकर, आशिष धर्माळे, समीर जवंजाळ, विशाल पवार, अशोक डोंगरे असे सर्वपक्षीय पदाधिकारी उपस्थित होते.

अशी वाहने कशी फिरतात ? अपघातास कारणीभूत ठरलेल्या ट्रकची पासिंग झालेली नव्हती, त्यावर नंबर प्लेट नव्हती आणि चालकाकडे ड्रायव्हिंग लायसन्स असण्याबाबतही शंका व्यक्त केली जात आहे. अशी वाहने शहरात बिनधास्त कशी फिरतात, असा सवालही या वेळी उपस्थित केला. या शिवाय अशा वाहनांची प्रशासन चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करेल, अशी अपेक्षाही व्यक्त केली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *