Headlines

अमरावतीत पोलिसाची गळफास घेऊन आत्महत्या‎:शहर कोतवाली पोलिस ठाण्यात हाेते कार्यरत; पोलिस दलात शोक, आत्महत्येच्या कारणाचा शोध सुरू‎



येथील शहर कोतवाली पोलिस ठाण्यात कार्यरत पोलिस हवालदार अमित उदयभान खंडारे (वय ४० वर्षे) यांनी बुधवारी वडाळी तील गुरुकृपा कॉलनी स्थित घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. दरम्यान फ्रेजरपुरा पोलिसांनी घटनास्थळी ध

.

अमित खंडारे हे गेल्या १५ वर्षांपासून पोलिस दलात सेवा देत होते.अमित खंडारे यांची १९ जूनला वाहतूक शाखेतून शहर कोतवालीत बदली झाली होती. त्यानंतर २२ जूनला त्यांना पोलिस मुख्यालयात रिफ्रेशर कोर्ससाठी पाठवले होते. ते गुरुकृपा कॉलनीतील घराच्या पहिल्या माळ्यावर पत्नी, दोन मुलांसह राहत होते. त्यांच्या कुटुंबात आई सत्यभामा, पत्नी शुभांगी, मुलगी अनुष्का (१४), मुलगा अद्विक (१०) यांचा समावेश आहे. बुधवारी सकाळी साडेसातच्या सुमारास त्यांची शिक्षिका असलेली पत्नी दोन्ही मुलांसह शाळेसाठी घराबाहेर पडली. आई त‌‌‌ळमजल्यावर असल्याने अमित खंडारे वरच्या मा‌‌‌‌ळ्यावर एकटे होते. त्यातच त्यांनी पत्नीच्या स्कार्फच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले. काही वेळाने हे कुटुंबीयांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच फ्रेजरपुरा पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. आत्महत्येचे कारण शोधण्यासाठी पोलिसांकडून तपास केला जात आहे. आत्महत्येचे नेमके कारण पोलिस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.घटनास्थळी सुसाइड नोट किंवा पत्र आढळलेले नाही, त्यामुळे आत्महत्येचे गूढ वाढले आहे. या प्रकरणी फेजरपुरा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिस आयुक्त राकेश ओला यांनी पोलिस अधिकाऱ्यांसह घटनास्थळाला भेट दिली. त्यानंतर रुग्णालयात पोहोचून त्यांनी शवविच्छेदन कक्षाजवळ खंडारे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांनी फ्रेजरपुरा पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांना तपासाबाबत आवश्यक त्या सूचनाही दिल्या.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *