![]()
कल्याणमधील खडकपाडा परिसरात एका पिसाळलेल्या भटक्या कुत्र्याने रविवारी नागरिकांवर हल्ला करत तब्बल 130 हून अधिक जणांना चावा घेतल्याची धक्कादायक घटना घडली. रस्त्याने जाणारे नागरिक, परिसरातील रहिवासी आणि वाहनचालक यांनाही या कुत्र्याने लक्ष्य केले. घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. पोलिस, महापालिका आणि श्वान पकडणाऱ्या पथकाने रात्रभर शोधमोहीम राबवून संबंधित कुत्र्याला अखेर पकडले. रेल्वे स्थानक परिसरातही हल्ले खडकपाड्यातील घटना ताजी असतानाच सोमवारी सकाळी कल्याण रेल्वे स्थानक परिसरातही भटक्या कुत्र्याने प्रवाशांवर हल्ला केल्याची माहिती समोर आली. प्राथमिक माहितीनुसार, सकाळपासून 10 ते 15 जणांना कुत्र्याने चावा घेतला. सलग दोन दिवस घडलेल्या या घटनांमुळे नागरिक आणि रेल्वे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या त्रासाबाबत महापालिकेच्या उपाययोजनांवर प्रश्न उपस्थित होत आहेत. 130 हून अधिक श्वानदंशाचे रुग्ण या घटनांनंतर दोन दिवसांत कल्याण परिसरात 130 हून अधिक श्वानदंशाचे रुग्ण विविध रुग्णालयांत उपचारासाठी दाखल झाल्याची माहिती आहे. त्यापैकी 48 रुग्णांवर कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात उपचार करण्यात आले. बहुतेक रुग्णांना प्राथमिक उपचार आणि अँटी-रेबीज लस देऊन घरी सोडण्यात आले, तर गंभीर जखमी झालेल्या दोन रुग्णांना पुढील उपचारासाठी मुंबईतील सायन रुग्णालयात हलवण्यात आले आहे. उर्वरित जखमींवर खासगी रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. महापालिकेपुढे आव्हान सलग दोन दिवस भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांच्या घटना घडल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे. हेही वाचा.. वादळी पावसाचा इशारा : पुणे घाटांसह अकोला-अमरावतीत मुसळधार पावसाची शक्यता; अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट राज्यात पावसाचा लपंडाव सुरू असतानाच, आता पुन्हा एकदा काही भागांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विशेषतः पुण्याचा घाटमाथा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना पावसाचा मोठा तडाखा बसण्याची शक्यता आहे. सविस्तर वाचा
Source link
कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याचा धुमाकूळ:अवघ्या 7 तासांत तब्बल 130 जणांना घेतला चावा; रेल्वेस्टेशन परिसरातही प्रवाशांवर हल्ले, अनेक जखमी