![]()
ज्येष्ठ अभिनेते परेश रावल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) वर एक पोस्ट करत आयएएस अधिकारी (IAS) तुकाराम मुंडे यांच्या समर्थनार्थ भूमिका घेतली आहे. त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट टॅग करत, तुकाराम मुंडे यांची त्यांच्या विभागातून बदली न करण्याची आग्रही विनंती केली आहे. सध्या तुकाराम मुंढे हे अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाचे आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. या विभागातही त्यांची धडाकेबाज कामगिरी सुरू आहे. त्यामुळे त्यांच्या बदलीची चर्चाही रंगते आहे. त्यामुळेच परेश रावल यांनी आता थेट फडणवीसांना साकडे घातले आहे. ट्विटमध्ये परेश रावल यांनी काय म्हटले? परेश रावल यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले की, “अत्यंत नम्रता आणि आदराने सांगायचे झाले तर, आयएएस अधिकारी तुकाराम मुंडे यांचे रक्षण करणे आणि त्यांची त्यांच्या विभागातून बदली किंवा हकालपट्टी होणार नाही याची काळजी घेणे हे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्राधान्य आणि ‘धर्म’ असले पाहिजे.” कठोर कारवाईमुळे चर्चेत काही महिन्यांपूर्वीच तुकाराम मुंढे दिव्यांग कल्याण विभागात होते. येथे त्यांनी बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांच्या आधारे सरकारी नोकरी मिळवणाऱ्या शेकडो कर्मचाऱ्यांवर कारवाई केली. अनेकांना निलंबित केले. त्यांच्या या मोहिमेमुळे प्रशासनात मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर त्यांची दिव्यांग कल्याण विभागातून राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन, पुनर्वसन आणि मदत कार्य विभागात बदली करण्यात आली होती. मात्र, दीड महिन्याचा कालावधी पूर्ण होण्याआधीच राज्य सरकारने त्यांची अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त म्हणून बदली केले. येथे येताच त्यांनी राज्यभरातल अन्न भेसळीविरोधात कठोर कारवाई सुरू केली. थेट मुंबई महापालिका ते कोर्टाच्या कँटीनसुद्धा त्यांनी सोडल्या नाहीत. त्यामुळे त्यांच्या बदलीची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. कर्मचाऱ्यांची मुंढेंविरोधात तक्रार छत्रपती संभाजीनगर येथील राज्य अन्न व औषध प्रशासन प्रयोगशाळेतील तब्बल 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीविरोधात अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. वाढीव कामाचा ताण, दोन शिफ्टची कार्यपद्धती आणि सुट्टीच्या दिवशीही काम करण्याचे आदेश यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. प्रयोगशाळेत अचानक दोन शिफ्टमध्ये काम सुरू केले. मात्र, त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ, तांत्रिक सुविधा आणि संसाधने उपलब्ध करून देण्यात आली नसल्याचा कर्मचाऱ्यांचा आरोप आहे. विद्यमान कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा भार पडत असून सकाळी 9 वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत काम करावे लागत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही काम करण्याचे आदेश देण्यात आल्याने कर्मचाऱ्यांच्या काम-जीवन समतोलावर परिणाम होत आहे. वाढीव कामासाठी आवश्यक सुविधा किंवा अतिरिक्त मनुष्यबळ न देता कामकाज वाढविण्यात आल्याने कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. कर्मचाऱ्यांचे मुख्य आरोप काय आहेत? 15 जुलै रोजी अन्न व औषध प्रशासन मंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनात कर्मचाऱ्यांनी खालील गंभीर आक्षेप नोंदवले आहेत. कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या काय आहेत? प्रयोगशाळेतील सहसंचालकांसह 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या असलेल्या या निवेदनात प्रशासनासमोर खालील प्रमुख मागण्या ठेवण्यात आल्या आहेत. चर्चेला उधाण तुकाराम मुंढे यांची धडाकेबाज कारवाई, त्यात कर्मचाऱ्यांचा असंतोष आणि त्यातच परेश रावल यांच्या या ट्विटमुळे तुकाराम मुंडे यांच्या संभाव्य बदलीच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे. एक प्रामाणिक आणि कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तुकाराम मुंढे यांच्या पाठीशी परेश रावल यांच्यासारख्या ज्येष्ठ अभिनेत्याने उघडपणे उभे राहिल्याने सोशल मीडियावर या विषयावर मोठी चर्चा सुरू झाली आहे.
Source link
तुकाराम मुंढे यांची FDA मधली बदली थांबवा:अभिनेते परेश रावल यांचे थेट CM देवेंद्र फडणवीस यांना आवाहन; पुन्हा चर्चांना उधाण