![]()
नवी पेठेतील एका खासगी रुग्णालयात 11 महिन्यांच्या बालकाच्या मृत्यू प्रकरणी डॉक्टरांसह दोन परिचारिकांविरुद्ध सहकारनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वैद्यकीय उपचारात निष्काळजीपणा केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकरणी डॉ. मुकुंद संगमनेरकर, डॉ. गणेश आरेकर, डॉ. श्रीधर जाधव, डॉ. राधा संगमनेरकर, तसेच परिचारिका मनीषा शिंदे आणि सारिका सुतार यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हनुमंत गणपतराव गिते (वय 34, रा. हेरंब सोसायटी, बालाजीनगर, धनकवडी) यांनी सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, हनुमंत गिते यांची 11 महिन्यांची मुलगी आदिती हिला उलटीचा त्रास होत असल्याने मे 2025 रोजी नवी पेठेतील या खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. गिते यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, डॉक्टरांना उपचारात हलगर्जी केल्यास मुलीचा मृत्यू होऊ शकतो याची जाणीव होती. तरीही डॉक्टर आणि परिचारिकांनी चुकीच्या पद्धतीने उपचार केल्याने त्यांच्या मुलीचा मृत्यू झाला. या प्रकरणाची चौकशी ससून रुग्णालयातील वैद्यकीय तज्ज्ञांच्या समितीकडे सोपवण्यात आली होती. समितीने केलेल्या चौकशीत, 11 महिन्यांच्या बालिकेवर चुकीच्या पद्धतीने उपचार करण्यात आल्याचे आणि वैद्यकीय निष्काळजीपणामुळेच तिचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. वैद्यकीय तज्ज्ञांच्या समितीच्या निष्कर्षांनंतर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले. महाराष्ट्र वैद्यकीय व्यावसायिक अधिनियम 2023 अन्वये हा गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलिस उपनिरीक्षक काळे पुढील तपास करत आहेत. ॲसीड फेकत चेहरा विद्रुप करण्याची धमकी एकावर गुन्हा दाखल तरूणीला चेहऱ्यावर ॲसीड फेकुन विद्रुप करण्याची धमकी देऊन तिच्याशी अश्लिल चाळे करत विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अजय तळेगाव (रा. संभाजीनगर, कदमवाक वस्ती, ता. हवेली, जि. पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत एका 25 वर्षीय तरूणीने लोणी काळभोर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे
Source link
पुण्यात 11 महिन्यांच्या बालिकेचा मृत्यू:खासगी रुग्णालयातील 4 डॉक्टरांसह 2 परिचारिकांवर गुन्हा दाखल, बालिकेवर झाले होते चुकीचे उपचार