![]()
सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. चार ठिकाणी उड्डाणपुलाचे काम सुरू असून त्या ठिकाणी मोठाले खड्डे खोदून ठेवण्यात आली आहेत. अंधार आणि पाणी यामुळे हे खड्डे वाहनचालकांना दिसत नाहीत. नंदुरबार इथून छत्रपती संभाजीनगरकडे जात असलेल्या स
.
या दुर्घटनेत मृत्यू पावलेले संभाजी विश्वनाथ कांबळे यांनी २४ वर्षे लष्करामध्ये सेवा बजावली. त्यानंतर ते नंदुरबार येथील पोलिस ठाण्यात ज्युनियर लिपिक म्हणून नोव्हेंबर २०२५ ला रुजू झाले होते. ते एमएच २० एचएच ३८८७ या क्रमांकाच्या कारमधून आपल्या मूळ गावी बलसूर (ता. उमरगा) येथे जात होते.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने या महामार्गावर चार ठिकाणी उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. या ठिकाणी अंधार आहे. जागोजागी रस्ता खोदून ठेवलेला आहे. दुभाजक लावलेले नाहीत. खड्ड्यांचा अंदाज न आल्याने कार खड्ड्यात कोसळली. सामाजिक कार्यकर्ते योगेश कोल्हे यांनी कन्नड शहर पोलिस ठाण्यास घटनेची माहिती दिली. या ठिकाणी सहायक पोलिस निरीक्षक सतीश दिंडे, सहायक फौजदार नासेर पठाण, बागूल, गुड्डू बेग, नारायण ढाकणे, किरण पवार, अमर यादव यांनी भेट दिली. गंभीर जखमी कांबळे यांना रुग्णवाहिकेतून कन्नड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण पवार, डॉ. मनीषा मोतिंगे यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. मृत कांबळे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व मुलगी असा परिवार आहे.