Headlines

पैठण शहरात जागतिक आदिवासी दिनानिमित्त जाणीव जागृती मेळावा:आदिवासी समाजाच्या विकासासाठी एकजूट आवश्यक- आमदार भुमरे‎




आदिवासी समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि सांस्कृतिक विकासासाठी समाजातील प्रत्येक घटकाने एकत्र येऊन संघटितपणे प्रयत्न करण्याची गरज आहे. शिक्षणाच्या माध्यमातून पुढील पिढी सक्षम करून शासनाच्या विविध योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी सामूहिक प्रयत्न करावेत, असे आवाहन आदिवासी समाजाच्या जाणीव जागृती मेळाव्यात आमदार विलास भुमरे यांनी व्यक्त केले. पैठण शहरातील आशीर्वाद मंगल कार्यालयात हा कार्यक्रम जागतिक आदिवासी दिनानिमित्त उत्साहात पार पडला. यावेळी नगराध्यक्ष भूषण कावसानकर, विनोद बोंबले, पोपट औटे, डॉ. पंडित किल्लारीकर यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना आमदार भुमरे यांनी सांगितले की, आदिवासी समाजात हक्क, अधिकार, शिक्षण, रोजगार आणि शासनाच्या कल्याणकारी योजनांबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने हा मेळावा महत्त्वाचा आहे. शिक्षणातून प्रगतीचा मार्ग आदिवासी समाजाने आपल्या पारंपरिक संस्कृती व अस्मितेचे जतन करत आधुनिक शिक्षण आणि विकासाच्या प्रवाहात सक्रिय सहभाग घेणे आवश्यक आहे. शासनाच्या विविध शैक्षणिक सुविधा, रोजगार योजना, सामाजिक व आर्थिक विकासाच्या योजनांची माहिती समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी संघटित प्रयत्न करण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी भूषण कावसानकर समाजातील समस्या सोडविण्यासाठी आवाज उठविण्यासोबतच उपलब्ध संधींचा प्रभावी वापर करावा, असे आवाहन केले. यावेळी गोरख पवार, विनोद बोबले, भूषण कावसानकर, संजय लघाने, पोपट औटे, राजू गायकवाड, मनोज गायके, विलास आडसूल, यांच्यासह आदिवासी समाजातील नागरिक उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *