Headlines

अमरावती अत्याचार प्रकरण:अयानसोबत केक कापला;‎ 6 ‎पोलिस कर्मचारी मुख्यालयात जमा, आरोपींची संख्या आठ




मुलींना जाळ्यात ओढून त्यांच्याशी ‎‎अश्लील वर्तन केल्याप्रकरणी ग्रामीण ‎‎पोलिसांनी अयान अहमद तनविर‎‎ अहमद (वय 19)‎‎ या मुख्य आरोपीला ‎‎‎तीन दिवसांपूर्वी ‎‎अटक केली आहे.‎ ‎या प्रकरणाचा मुख्य ‎‎‎सूत्रधार अयान‎‎ आणि परतवाडा ‎‎‎पोलिस ठाण्यातील ‎एक पोलिस अधिकारी-कर्मचारी ‎एकत्रीत येवून केक कापतानाचा एक ‎जुना व्हिडिओ आता सोशल ‎मीडियावर व्हायरल झाला आहे. हा ‎‎व्हिडिओ पोलिस अधीक्षकांपर्यंत ‎‎पोहोचल्यानंतर त्यांनी तत्काळ‎ कारवाई करत परतवाडा ठाण्यातील ‎एका सहायक पोलिस निरीक्षकासह ‎सहा पोलिसांना तत्काळ मुख्यालयात ‎‎संलग्न (अटॅच) केले आहे. हा प्रकार ‎‎नेमका कधी आणि कुठे घडला, ‎‎याबाबतही सविस्तर चौकशी आता ‎केली जाणार आहे.‎ दरम्यान अयान मुलींना ‎‎फिरायला नेण्याच्या बहाण्याने‎ सोबत घेऊन जात असे. मुलींसोबत‎ गैरवर्तन करण्यासाठी त्याने आतापर्यंत ‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎वझ्झर डॅम, परतवाडा शहरातील तीन‎ आणि अमरावती शहरातील दोन अशा ‎पाच कॅफेंचा वापर केल्याचे पोलिस‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ तपासात निष्पन्न झाले आहे. मानव‎सुगंधे याचा कठोरा नाका भागात ‎फ्लॅट आहे; या फ्लॅटवर मुलीला‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ घेऊन गेला आणि अत्याचार केला.‎अयानने एका पीडितेवर अत्याचार‎ केल्याचे व्हिडिओतून समोर आले.‎ या प्रकरणात आजवर एकही पीडिता ‎स्वतःहून समोर आली नाही मात्र, पंधरा ‎दिवसांपूर्वी एक मुलगी पालकांसह ‎तक्रार देण्यासाठी परतवाडा पोलिस‎ ठाण्यात गेली असल्याची माहिती समोर ‎येत आहे. तिची तक्रार नोंदवण्यात ‎आली नाही का? किंवा या प्रकरणात ‎नेमके काय घडले, याची सखोल‎ चौकशी करण्याचे आदेश पोलिस‎ अधीक्षकांनी अचलपूरचे एसडीपीओ ‎तथा एसआयटी प्रमुख शुभमकुमार ‎यांना दिले आहेत. जे दोषी आढळतील ‎त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल.‎ आठही आरोपींच्या घरांची ‎पोलिसांनी घेतली झडती‎ मानव हा त्याला पैशांच्या मोबदल्यात हा‎ फ्लॅट उपलब्ध करून देत होता. ही बाब‎समोर आल्यानंतर गुरुवारी ग्रामीण‎ पोलिसांनी या फ्लॅटवर जाऊन पंचनामा ‎केला व इतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण ‎केली. पोलिसांनी यापूर्वीच अयानकडून ‎एक मोबाईल जप्त केला होता, त्यानंतर‎आता एक लॅपटॉप आणि टॅबही जप्त ‎करण्यात आला असून त्यातील डेटा‎ मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.‎ तसेच, पोलिसांनी आतापर्यंत सर्व‎ आठही आरोपींच्या घरांची झडती घेऊन‎त्यांचे मोबाईल जप्त केले आहेत.‎ पुरावे किंवा माहीती‎ असल्यास आम्हाला द्यावी‎ या प्रकरणात अयानकडून एका ‎पिडीतेसोबत लैंगिक अत्याचार झाला ‎असून ते घटनास्थळ शहरातील आहे.‎त्यामुळे पोलिस आयुक्तांनासुद्धा आम्ही‎ त्याबाबत सविस्तर माहीती दिली आहे.‎ या प्रकरणात आतापर्यंत आठ जणांना ‎अटक झाली असून आरोपींची संख्या ‎वाढण्याची शक्यता आहे. तसेच‎ राजकिय व्यक्तींकडे या प्रकरणाशी‎ संबधित काही पुरावे किंवा माहिती‎ असल्यास आम्हाला द्यावी, जेणेकरुन ‎तपासात मदत होईल.‎ – विशाल आनंद, पोलिस अधिक्षक.‎ कठोरा नाका भागातील मित्राच्या खोलीचा केला वापर‎ शहरातील कठोरा नाका भागातील एका‎मित्राच्या खोलीचा वापर केला होता. ही‎ खोली उपलब्ध करून देणाऱ्या त्याच्या ‎मित्रालाही पोलिसांनी गुरूवारी (दि. 16)‎ अटक केली असून, अयान अहमद ‎तनविर अहमद (19, रा. परतवाडा),‎उजेर खान इक्बाल खान (20), मो. साद‎मो. साबिर (22), तरबेज खान तसलीम‎ खान (24, तिघेही रा. अचलपूर), मानव ‎दिपक सुगंधे (20, रा. आर्वी, ह. मु.‎अमरावती), ऐफाज खान मंजुर खान ‎(26), मो. इमरान मो. साजीद (21)‎आणि शेख नावेद शेख हसन (21,‎तिघेही रा. अचलपूर) असे अटक‎ केलेल्या आरोपींची नावे आहेत.‎ ‎‎



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *