![]()
मुलींना जाळ्यात ओढून त्यांच्याशी अश्लील वर्तन केल्याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी अयान अहमद तनविर अहमद (वय 19) या मुख्य आरोपीला तीन दिवसांपूर्वी अटक केली आहे. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार अयान आणि परतवाडा पोलिस ठाण्यातील एक पोलिस अधिकारी-कर्मचारी एकत्रीत येवून केक कापतानाचा एक जुना व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पोलिस अधीक्षकांपर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी तत्काळ कारवाई करत परतवाडा ठाण्यातील एका सहायक पोलिस निरीक्षकासह सहा पोलिसांना तत्काळ मुख्यालयात संलग्न (अटॅच) केले आहे. हा प्रकार नेमका कधी आणि कुठे घडला, याबाबतही सविस्तर चौकशी आता केली जाणार आहे. दरम्यान अयान मुलींना फिरायला नेण्याच्या बहाण्याने सोबत घेऊन जात असे. मुलींसोबत गैरवर्तन करण्यासाठी त्याने आतापर्यंत वझ्झर डॅम, परतवाडा शहरातील तीन आणि अमरावती शहरातील दोन अशा पाच कॅफेंचा वापर केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. मानवसुगंधे याचा कठोरा नाका भागात फ्लॅट आहे; या फ्लॅटवर मुलीला घेऊन गेला आणि अत्याचार केला.अयानने एका पीडितेवर अत्याचार केल्याचे व्हिडिओतून समोर आले. या प्रकरणात आजवर एकही पीडिता स्वतःहून समोर आली नाही मात्र, पंधरा दिवसांपूर्वी एक मुलगी पालकांसह तक्रार देण्यासाठी परतवाडा पोलिस ठाण्यात गेली असल्याची माहिती समोर येत आहे. तिची तक्रार नोंदवण्यात आली नाही का? किंवा या प्रकरणात नेमके काय घडले, याची सखोल चौकशी करण्याचे आदेश पोलिस अधीक्षकांनी अचलपूरचे एसडीपीओ तथा एसआयटी प्रमुख शुभमकुमार यांना दिले आहेत. जे दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. आठही आरोपींच्या घरांची पोलिसांनी घेतली झडती मानव हा त्याला पैशांच्या मोबदल्यात हा फ्लॅट उपलब्ध करून देत होता. ही बाबसमोर आल्यानंतर गुरुवारी ग्रामीण पोलिसांनी या फ्लॅटवर जाऊन पंचनामा केला व इतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. पोलिसांनी यापूर्वीच अयानकडून एक मोबाईल जप्त केला होता, त्यानंतरआता एक लॅपटॉप आणि टॅबही जप्त करण्यात आला असून त्यातील डेटा मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसेच, पोलिसांनी आतापर्यंत सर्व आठही आरोपींच्या घरांची झडती घेऊनत्यांचे मोबाईल जप्त केले आहेत. पुरावे किंवा माहीती असल्यास आम्हाला द्यावी या प्रकरणात अयानकडून एका पिडीतेसोबत लैंगिक अत्याचार झाला असून ते घटनास्थळ शहरातील आहे.त्यामुळे पोलिस आयुक्तांनासुद्धा आम्ही त्याबाबत सविस्तर माहीती दिली आहे. या प्रकरणात आतापर्यंत आठ जणांना अटक झाली असून आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. तसेच राजकिय व्यक्तींकडे या प्रकरणाशी संबधित काही पुरावे किंवा माहिती असल्यास आम्हाला द्यावी, जेणेकरुन तपासात मदत होईल. – विशाल आनंद, पोलिस अधिक्षक. कठोरा नाका भागातील मित्राच्या खोलीचा केला वापर शहरातील कठोरा नाका भागातील एकामित्राच्या खोलीचा वापर केला होता. ही खोली उपलब्ध करून देणाऱ्या त्याच्या मित्रालाही पोलिसांनी गुरूवारी (दि. 16) अटक केली असून, अयान अहमद तनविर अहमद (19, रा. परतवाडा),उजेर खान इक्बाल खान (20), मो. सादमो. साबिर (22), तरबेज खान तसलीम खान (24, तिघेही रा. अचलपूर), मानव दिपक सुगंधे (20, रा. आर्वी, ह. मु.अमरावती), ऐफाज खान मंजुर खान (26), मो. इमरान मो. साजीद (21)आणि शेख नावेद शेख हसन (21,तिघेही रा. अचलपूर) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
Source link
अमरावती अत्याचार प्रकरण:अयानसोबत केक कापला; 6 पोलिस कर्मचारी मुख्यालयात जमा, आरोपींची संख्या आठ