![]()
एकवीसव्या महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळाव्यात विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गुरुवारी (दि. ८) सुवर्ण, रजत आणि कास्य पदके देऊन गौरव करण्यात आला. गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) वतीने राज्य राखीव पोलीस बलाच्या (एसआरपीएफ) गट क्रमांक २ च्या मैदानावर हा बक्षीस वितरण सोहळा पार पडला. दि. ५ ऑक्टोबरपासून सुरू असलेल्या या कर्तव्य मेळाव्यात विविध कौशल्यांवर आधारित स्पर्धा घेण्यात येत आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. आयटी प्रोफिशियन्सी (संगणक व माहिती-तंत्रज्ञानातील प्रावीण्य) स्पर्धेत पुणे बिनतारी संदेश विभागातील सहाय्यक पोलीस फौजदार अमोल कोकरे यांनी सुवर्णपदक पटकावले. नांदेड परिक्षेत्रातील पोलीस हवालदार राजेश कंचे यांनी रजत, तर मिरा-भाईंदर, वसई-विरार येथील सहाय्यक पोलीस फौजदार संदीप राणे यांनी कास्यपदक मिळविले. अँटी सबोटेज चेक ( घातपातविरोधी सुरक्षा तपासणी /ग्राउंड सर्च) स्पर्धेत महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनीचे पोलीस नाईक आशिष बाळकृष्ण पाटील यांनी सुवर्णपदक मिळविले. याच प्रबोधिनीचे पोलीस नाईक सतिश बाळकृष्ण गायकवाड यांनी रजत, तर गडचिरोली परिक्षेत्रातील पोलीस हवालदार पंकज हुळके यांनी कास्यपदक पटकावले. पोलीस फोटोग्राफी स्पर्धेत कोकण परिक्षेत्रातील पोलीस हवालदार ए. ए. गमरे यांनी सुवर्णपदक मिळविले. दहशतवाद विरोधी पथकातील (एटीएस) पोलीस शिपाई तुलशीदास पहारे यांनी रजत, तर ठाणे शहरातील पोलीस शिपाई सचिन सोपान चव्हाण यांनी कास्यपदक मिळविले. विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या हस्ते सर्व विजेत्यांना पदके प्रदान करून गौरविण्यात आले. यावेळी पोलीस अधीक्षक विवेक पाटील, पोलिस उपअधीक्षक जयश्री चिवडशेट्टी यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
Source link
पोलिस कर्तव्य मेळाव्यात IT, अँटी सबोटेज विजेत्यांना पदके:फोटोग्राफी स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना सुवर्ण, रजत, कास्य पदके देऊन गौरव