Headlines

अमरावती सुपर स्पेशालिटी कर्मचाऱ्यांचे पाच महिन्यांपासून वेतन नाही:किमान वेतनही मिळत नसल्याने काळे झेंडे दाखवत रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर आंदोलन.




अमरावती येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनी आज, गुरुवारी काळे झेंडे दाखवत आंदोलन केले. त्यांना गेल्या पाच महिन्यांपासून वेतन मिळाले नाही. किमान वेतनही मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र रोष आहे. रुग्णालयात ११२ चतुर्थश्रेणी कर्मचारी बाह्य यंत्रणेमार्फत काम करतात. त्यांना दरमहा सात हजार रुपयांपेक्षा कमी वेतन अनियमितपणे मिळते. बोनस व इतर कल्याणकारी योजनांचा लाभही नाही. आरोग्य सेवा संचालनालयाने वेतन नियमित देण्याचे निर्देश दिले होते, पण कार्यवाही झाली नाही. प्रशांत थेटे आणि प्रिया शिंगाडे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. रुग्णालय प्रशासनाने कर्मचाऱ्यांचे निवेदन स्वीकारले, जे अकोल्याच्या प्रभारी आरोग्य उपसंचालक डॉ. आरती कुलवाल यांच्याकडे पाठवले. तातडीने उपाययोजना न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *