Headlines

जरांगेंवर गुन्हा दाखल करा, तैलिक समितीची मागणी:पालकमंत्र्यांबाबत अपमानास्पद वक्तव्याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन




महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत अपमानास्पद आणि जातीय स्वरूपाची वक्तव्ये केल्याप्रकरणी मनोज जरांगे यांच्याविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी पुढे आली आहे. तैलिक समितीने मंगळवार, ११ ऑगस्ट रोजी जिल्हा प्रशासनाला या मागणीचे निवेदन दिले. जिल्हाधिकारी यांच्यावतीने उपजिल्हाधिकारी ज्ञानेश घ्यार यांनी हे निवेदन स्वीकारले. निवेदनात नमूद केल्यानुसार, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे राज्याचे ज्येष्ठ लोकप्रतिनिधी, महसूल मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून महत्त्वाची घटनात्मक व प्रशासकीय जबाबदारी सांभाळत आहेत. असे असताना जरांगे यांनी सार्वजनिक भाषणांमध्ये त्यांच्याविषयी अपमानास्पद व अवमानकारक शब्दांचा वापर केला. त्यांच्या जातीचा उल्लेख करून आणि त्यांच्या आडनावाची टर उडवून सार्वजनिकरीत्या त्यांचा अपमान करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप तैलिक समितीने केला आहे. या आंदोलनाचे नेतृत्व संघटनेचे विभागीय अध्यक्ष नगरसेवक संजय हिंगासपुरे आणि विभागीय महासचिव राजेंद्र हजारे यांनी केले. त्यांनी जरांगे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी केली. लोकशाहीत अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली लोकप्रतिनिधीला शिवीगाळ करणे, जातीय उल्लेख करणे आणि समाजात तेढ निर्माण करणारी वक्तव्ये करणे हे अत्यंत गंभीर व निषेधार्ह असल्याचे निवेदनात म्हटले आहे. अशा वक्तव्यांमुळे महाराष्ट्रातील सामाजिक सलोख्याला, कायदा-सुव्यवस्थेला आणि लोकशाही मूल्यांना धोका निर्माण होत असल्याचेही समितीने नमूद केले. यावेळी हिंगासपुरे व हजारे यांच्यासह राज्य सचिव अमोल आगासे, विदर्भ कार्याध्यक्ष विजय ढोले, जिल्हाध्यक्ष दीपक गिरोळकर, शहराध्यक्ष चंद्रशेखर जावरे, युवक समितीचे जिल्हाध्यक्ष अतुल मांडवे, तसेच पंकज बांगडे, आशिष खोडके, राजेंद्र गुल्हाने, प्रकाश बनारसे, प्रा. विजय गुल्हाने, किशोर जिरापुरे, अरुण बनारसे, प्रकाश जयसिंगपुरे, अशोक शेलोरकर, जयंत औतकर, अविनाश जसवंते, रंजनाताई लगड, प्रणीता शिरभाते, मीना श्रीराव, अनिता लांजेवार, प्रा. डॉ. मोनिका उमक, सविता भगत, किर्ती लोहे आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *