Headlines

State government orders work from home after threats to Kashmiri Pandit employees, army-affiliated organization releases names and numbers


  • Marathi News
  • National
  • State Government Orders Work From Home After Threats To Kashmiri Pandit Employees, Army affiliated Organization Releases Names And Numbers

मुदस्सीर कुल्लू | श्रीनगर2 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

काश्मीरमध्ये २ स्थलांतरित मजूर व एका पोलिस जवानाच्या हत्येच्या काही दिवसांनंतर काश्मिरी पंडितांना दहशतवाद्यांनी धमकी दिली आहे. ऑनलाइन जारी करण्यात आलेल्या पत्रात अनेक काश्मिरी पंडित सरकारी कर्मचाऱ्यांची नावे आणि फोन नंबर देण्यात आले आहेत. त्यांना खोऱ्यात परत न येण्याचा इशाराही देण्यात आला आहे. धमकी देणाऱ्या संघटनेनुसार, त्यांच्याकडे या कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय, पत्ता, कार्यालयाची माहिती आहे.

निर्वासित काश्मिरी म्हणाले – हा गंभीर धोका

निर्वासित काश्मिरी पंडितांचे प्रतिनिधित्व करणारे पनुन काश्मीरचे निमंत्रक अग्निशेखर म्हणाले की, कर्मचारी,कुटुंबीयांना धमकी चिंता वाढवणारी आहे.

काश्मिरी पंडित म्हणाले – भीती कायम असते

खोऱ्यात राहणाऱ्या एका काश्मिरी पंडिताने सांगितले, आम्ही काश्मीर सोडले नाही, पण पंडितांमध्ये कायम भीती असते. काश्मिरी पंडित संघर्ष समितीनेही चिंता व्यक्त केली. संघटनेने दावा केला आहे की, संबंधित विभागाच्या पथकाने एका कार्यालयातून काश्मिरी पंडित कर्मचाऱ्यांची नावे गोळा केली होती. यानंतर एक-दोन दिवसांतच त्याच कर्मचाऱ्यांची नावे धमकीच्या पोस्टरवर लिहिली गेली आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *