![]()
सण-उत्सवांच्या काळात राजकीय नेते आपल्या कार्यकर्त्यांना आणि जनतेला नेहमीच भरभरून शुभेच्छा देत असतात. मात्र, राज्याच्या महायुती सरकारमधील मंत्री आणि शिवसेना नेते भरत गोगावले यांनी अमावस्येच्या निमित्ताने कार्यकर्त्यांना दिलेल्या एका अजब सल्ल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. “१२ तारखेला गटारी आहे, आनंदाने खा-प्या, पण जास्त कुणी गटार-बिटारात लोळू नका,” असा सल्ला गोगावले यांनी दिला आहे. त्यांच्या या मिश्कील भाषणाची व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. नेमके काय म्हणाले गोगावले? भरत गोगावले यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी कार्यकर्त्यांना उद्देशून ते म्हणाले: पुढील दीड महिना संयम बाळगण्याचे आवाहन महाराष्ट्रात आषाढ अमावस्येला अनेकजण मांसाहर करतात. कारण, याच्या दुसऱ्या दिवशीपासून म्हणजेच श्रावण महिन्यापासून सलग महिनाभर मांसाहार वर्ज्य करण्याची परंपरा पाळली जाते. यंदा १३ ऑगस्टपासून पवित्र श्रावण महिन्याला सुरुवात होत असून, श्रावण संपताच गणेशोत्सवाची लगबग सुरू होणार आहे. याच सर्व सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पुढील दीड महिना तरी संयम बाळगा आणि स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या, अशा मजेशीर शब्दांत गोगावलेंनी आपल्या कार्यकर्त्यांचे कान टोचले आहेत. गोगावले यांच्या मिश्कील वक्तव्याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू असून, सोशल मीडियावरही नेटकऱ्यांकडून यावर मजेशीर प्रतिक्रिया येत आहे. हेही वाचा.. निवडणूक आयोगाने चोरांच्या हातात पक्षचिन्ह दिले!:शिवसेना सुनावणी आणि संसदेतील मोदी-शहांच्या अनुपस्थितीवरून राऊतांचा सरकारवर हल्लाबोल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्य आणि केंद्र सरकारवर अत्यंत गंभीर आरोप करत सडकून टीका केली. राज्यातील आदिवासी भागात होणारा भ्रष्टाचार, आश्रमशाळेत सर्पदंशाने झालेले मृत्यू, खाण माफियांचा सुळसुळाट आणि शिवसेना पक्षचिन्हाची सुनावणी या सर्वच मुद्द्यांवरून राऊत यांनी सरकारचे वाभाडे काढले. सविस्तर वाचा
Source link
आनंदाने खा-प्या, पण जास्त गटार-बिटारात लोळू नका!:भरत गोगावलेंचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला, व्हिडिओ व्हायरल