Headlines

आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात आनंदराज आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली आज संभाजीनगरात महामोर्चा:विभागीय आयुक्तालय ते अण्णा भाऊ साठे चौक रस्ता आज मोर्चामुळे बंद




अनुसूचित जातीच्या आरक्षणातील प्रस्तावित उपवर्गीकरण रद्द करण्याच्या मागणीसाठी आज, बुधवारी (12 ऑगस्ट) छत्रपती संभाजीनगर शहरात भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘रिपब्लिकन सेना’चे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली निघणाऱ्या या मोर्चात तब्बल 50 हजार ते 1 लाख भीमसैनिक सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी 600 हून अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. हा मोर्चा क्रांती चौकातून निघेल. तिथून पैठण गेट, गुलमंडी, सिटी चौक, किलेअर्कमार्गे पुढे सरकत विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकणार आहे. तिथे मोर्चाचे सभेत रूपांतर होईल. या मोर्चाचे मुख्य नेतृत्व आनंदराज आंबेडकर, डॉ. भीमराव आंबेडकर, माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, बबनराव घोलप, राजकुमार बडोले, माजी आमदार बाबुराव माने आणि ॲड. अमन आंबेडकर करणार आहेत. मोर्चाचे मुख्य संयोजक दिनकर ओंकार यांनी शहरातील विविध संस्था व सामाजिक संघटनांची मोट बांधली असून, सर्व संघटना पूर्ण शक्तीनिशी आजच्या मोर्चात उतरणार आहेत. हे मार्ग राहणार बंद आज दुपारी 12 वाजेपासून सभा संपेपर्यंत अण्णा भाऊ साठे चौक – विभागीय आयुक्त कार्यालय – उद्धवराव पाटील चौक हा मुख्य मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी पूर्णपणे बंद राहील. हे आहेत पर्यायी मार्ग 1. पर्यायी मार्ग 1: चांदणे चौक ➔ गणेश कॉलनी ➔ एन-12 विसर्जन विहीर ➔ सत्य विष्णू हॉस्पिटल चौक ➔ उद्धवराव पाटील चौक. 2. पर्यायी मार्ग 2: उद्धवराव पाटील चौक ➔ हडको कॉर्नर ➔ टीव्ही सेंटर. नागरिकांनी आज शहरात बाहेर पडताना वाहतुकीच्या या बदलांची नोंद घेऊन पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *