Headlines

राज ठाकरे थेट 'वर्षा'वर:मुख्यमंत्री फडणवीसांसोबत महत्त्वाची बैठक, राजकीय चर्चांना पुन्हा उधाण




गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी भाजप आणि महायुतीवर सातत्याने टीका करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. सकाळी ८.२० वाजण्याच्या सुमारास राज ठाकरे यांचा ताफा मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्यावर पोहोचला. भाजपवर आक्रमक भूमिका घेत असतानाच राज ठाकरेंनी घेतलेल्या या भेटीमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. भेटीचे प्रमुख कारण काय? राज ठाकरे यांच्यासोबत या भेटीत मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (MCA) अध्यक्ष अजिंक्य नाईक हेदेखील उपस्थित होते. मिळालेल्या माहितीनुसार, ही कोणतीही अचानक झालेली राजकीय भेट नसून दोन दिवसांपूर्वीच ठरलेली पूर्वनियोजित भेट होती. या बैठकीत खालील विषयांवर चर्चा झाल्याची शक्यता आहे.. शिवाजी पार्क जिमखाना: दादर येथील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानाची पुनर्रचना, तेथील क्रीडा सुविधा आणि खेळाडूंचे प्रश्न यावर चर्चा करण्यासाठी ही भेट असल्याची प्राथमिक माहिती आहे. मुंबई-गोवा महामार्ग: राज ठाकरे यांनी नुकतीच मुंबई-गोवा महामार्गाच्या दुर्दशेची स्वतः पाहणी केली होती. त्यामुळे या बैठकीत महामार्गाच्या रखडलेल्या कामाबाबत आणि जनतेच्या प्रश्नांबाबतही मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा होऊ शकते. भेटीला राजकीय महत्त्व का? एकीकडे ही भेट मुंबईतील प्रश्नांवर असली तरी, सद्यस्थितीतील राजकीय घडामोडींमुळे या भेटीकडे विशेष लक्ष वेधले गेले आहे. ठाकरे बंधूंची युती: नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येत शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसेची युती केली होती. या नव्या समीकरणामुळे राज्याच्या राजकारणात मोठे बदल पाहायला मिळाले. भाजपवर सातत्यपूर्ण टीका: ठाकरे बंधू एकत्र आल्यापासून राज ठाकरेंनी भाजपविरोधात अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि नितीन गडकरी यांच्यावर जाहीर सभांमधून जोरदार टीका केली आहे. तसेच, विद्यार्थ्यांच्या आंदोलनात तत्कालीन शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचीही त्यांनी आग्रही मागणी केली होती. हेही वाचा.. घाटकोपरमध्ये घरांवर दरड कोसळली:2 जणांचा मृत्यू; 5 ते 6 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, बचावकार्य सुरू मुंबईत रात्रभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे घाटकोपर-साकीनाका परिसरात एक अत्यंत भीषण दुर्घटना घडली आहे. येथील चिरागनगर परिसरात गौसिया चाळीवर अचानक डोंगराचा मोठा कडा (दरड) कोसळल्याने दोन ते तीन घरे ढिगाऱ्याखाली दबली गेली आहेत. या दुर्घटनेत आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली असून, आणखी ५ ते ६ जण या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. सविस्तर वाचा मुंबई- आगीत अडीच वर्षांच्या मुलासह दोघांचा मृत्यू:चौघांवर रुग्णालयात उपचार सुरू; अग्निशमन दल घटनास्थळी; कारण अस्पष्ट मुंबईतील विलेपार्ले परिसरात मंगळवारी रात्री एका निवासी इमारतीला लागलेल्या आगीत अडीच वर्षांच्या मुलासह दोघांचा मृत्यू झाला. ही आग इमारतीच्या ११ व्या मजल्यावर आग लागली. अग्निशमन दलाने दोन महिला, एक पुरुष आणि एका मुलासह चार जणांना वाचवून रुग्णालयात पाठवले. शांता भवन नावाच्या इमारतीत रात्री १० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. महापालिका अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *