![]()
मोहोळ-सोलापूर मार्गावरील सर्व्हिस रोडलगत असलेल्या अंडरग्राउंड गटारीच्या शेजारी काही गाळेधारकांनी दुकानांपर्यंत चारचाकी वाहने नेण्यासाठी मोठ्या प्रमाणात मुरूम टाकल्याने सर्व्हिस रोड अरुंद झाला आहे. परिणामी या मार्गावरून नियमित ये-जा करणाऱ्या विद्यार्थी, नागरिक तसेच वाहनचालकांची मोठी गैरसोय होत आहे. अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. संबंधित ठिकाणी टाकण्यात आलेला मुरूम तातडीने हटवून सर्व्हिस रोड पूर्ववत रुंद करावा, अशी मागणी विद्यार्थी व नागरिकांमधून होत आहे. मोहोळ-सोलापूर मार्गावरून सांगली, सातारा, कोल्हापूर, मिरज, सांगोला, पंढरपूर यासह मुंबई, पुणे, इंदापूर, टेंभुर्णी आदी मार्गांवर धावणाऱ्या एसटी बससह खासगी वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. याच सर्व्हिस रोडवरून शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी, स्थानिक नागरिक तसेच विविध वाहनांची नियमित ये-जा सुरू असते. सर्व्हिस रोडच्या बाजूला अंडरग्राउंड गटार तयार करण्यात आले आहे. मात्र, आपल्या दुकानापर्यंत चारचाकी वाहने सहज नेता यावीत, या उद्देशाने काही गाळेधारकांनी गटारीच्या शेजारी मोठ्या प्रमाणात मुरूमाचा भराव टाकला आहे. त्यामुळे रस्त्याची उपलब्ध जागा कमी होऊन सर्व्हिस रोड अरुंद झाला आहे. विशेषतः शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी व विद्यार्थिनींना या ठिकाणाहून जाताना वाहनांच्या गर्दीतून मार्ग काढावा लागत आहे. एकाच वेळी समोरासमोर सर्व्हिस रोड हा सार्वजनिक वाहतुकीसाठी महत्त्वाचा मार्ग असताना त्यावर अतिक्रमणसदृश पद्धतीने मुरूमाचा भराव टाकण्यात आला आहे. संबंधित ठिकाणची प्रत्यक्ष पाहणी करून मुरूम टाकण्यास परवानगी आहे का, रस्त्याची जागा अडविण्यात आली आहे का, याची प्रशासनाने तपासणी करावी. नियमबाह्य प्रकार असल्यास तातडीने कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. ^सर्व्हिस रोड तसेच अंडरग्राउंड गटार या दोन्हीच्या मध्ये गाळेधारकांनी मुरूम भरला आहे. त्यामुळे सदर ठिकाणावरून ये-जा करताना जीव मुठीत घेऊन जाण्याची वेळ येत आहे. सदर ठिकाणावरून जात असताना हा फोरविलर सह टू व्हीलर वाहन आपल्या अंगावर येते की काय अशी भीती निर्माण होत आहे. त्वरित सदर मुरूम काढून दिलासा द्यावा. – मंजू कुरेशी, नागरिक सर्व्हिस रोड अरुंद झाल्याने विद्यार्थ्यांना वाहनांच्या अगदी जवळून मार्ग काढत जावे लागत आहे. या मार्गावर एसटी बस व खासगी वाहनांची मोठी वर्दळ असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाने दुर्घटना घडण्याची वाट न पाहता मुरूम हटवून रस्ता मोकळा करावा, अशी नागरिकांची मागणी आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न आला ऐरणीवर जीव मुठीत घेऊन जाण्याची वेळ
Source link
मुरूमाने मोहोळ-सोलापूर सर्व्हिस रोड अरुंद; विद्यार्थ्यांसह वाहनचालकांची होतेय गैरसोय:भराव टाकल्याने वाहतुकीस अडथळा; मुरूम हटवण्याची मागणी