Headlines

जायखेडा-बिजोटे रस्त्याच्या दुरूस्तीला प्रारंभ:अनेक दिवसांच्या त्रासानंतर नागरिकांना दिलासा; वाहतूक हाेणार सुलभ‎




बागलाण तालुक्यातील जायखेडा-बिजोटे रस्त्याच्या प्रत्यक्ष दुरुस्तीला सुरुवात झाली आहे. पावसामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडून त्यात पाणी साचल्याने वाहनचालक, शेतकरी, विद्यार्थी आणि नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. याबाबत ‘दिव्य मराठी’ने मंगळवारी (दि. ४) वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेऊन संबंधित विभागाने या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. जायखेडा–बिजोटे हा परिसरातील दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचा मार्ग आहे. जायखेडा व सटाणा या प्रमुख शहरांशी संपर्क साधण्यासाठी तसेच शेतमाल बाजारपेठेत नेण्यासाठी शेतकरी या मार्गाचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. मात्र, पावसामुळे रस्त्याची अवस्था बिकट झाल्याने प्रवास धोकादायक बनला होता. मंगळवारी दि. ४ ऑगस्ट २०२६ च्या अंकात प्रसिद्ध झालेले वृत्त. लक्षात घेऊन कामाला तातडीने सुरुवात करण्यात आली आहे. हा सुमारे ५०० मीटरचा रस्ता असून, त्याचे संपूर्ण काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे रस्ता अधिक मजबूत आणि टिकाऊ होऊन नागरिकांची वाहतुकीची समस्या दूर होईल. – जगदीश सपकाळे, बांधकाम विभाग, सटाणा तात्पुरती डागडुजी नको दुरुस्तीला सुरुवात झाल्याने समाधान व्यक्त होत असले तरी केवळ तात्पुरती मलमपट्टी न करता रस्त्याचे दर्जेदार व टिकाऊ काम करावे, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. पावसाळ्यानंतर पुन्हा रस्ता उखडू नये, यासाठी कामाच्या गुणवत्तेकडे लक्ष देण्याची अपेक्षा आहे. कामाला सुरुवात झाली, ही समाधानाची बाब आहे. मात्र पुन्हा काही दिवसांत रस्ता खड्ड्यात जाऊ नये. कायमस्वरूपी आणि दर्जेदार काम झाले पाहिजे, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *