![]()
एमआयएमचे आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांनी ८ डिसेंबर २०११ रोजी नांदेड येथील सभेत प्रभू श्रीराम, माता कौसल्या यांची टिंगलटवाळी करणारी विधाने केली होती. या प्रकरणी नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर पोलिस ठाण्यात कलम २९५ अ (धार्मिक भावना दुखावणे) आणि २९८ अन्वये दा
.
न्या. आर. एम. जोशी यांनी ओवेसींची याचिका फेटाळून लावली. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या रामजन्मभूमी निकालाचा संदर्भ देत ओवेसींनी केलेले वक्तव्य घाईगडबडीत किंवा अनवधानाने केलेले नसून नियोजित, पूर्वग्रहदूषित आणि एका विशिष्ट वर्गाच्या धार्मिक भावना दुखावण्याच्या हेतूने केलेले होते. त्यावर अर्जदाराने आक्षेप घेतला होता.
हायकोर्ट निर्णयामुळे नियमित खटला चालेल
- उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे ओवेसी यांच्यावर अर्धापूर न्यायालयात नियमित फौजदारी खटला चालेल.
- न्यायाधीशांनी नमूद केले की, असा वादग्रस्त व्हिडिओ अजूनही यूट्यूबवर असणे गंभीर असून सरकारने तो तात्काळ हटवण्यासाठी पावले उचलावीत.
- राजकीय नेत्यांना धार्मिक भावना दुखावून किंवा टिंगलटवाळी करून फायदा घेता येणार नाही, असा स्पष्ट संदेश या निकालातून गेला आहे.