Headlines

सिंधी साहित्य संस्था मांडणार फाळणीचा इतिहास:शुक्रवारी कार्यक्रमाचे आयाेजन; नाटकासह डाक्युमेंट्री, देशभक्तीपर गीतेही गाणार‎



महाराष्ट्र राज्य सिंधी साहित्य अकादमी, विदर्भ सिंधी विकास परिषद आणि महिला संघाच्या संयुक्त सहकार्याने ‘विभाजन की विभीषिका’ (फाळणीच्या भीषण वेदनांचा स्मृती दिन) निमित्त एकांकीका, डाक्युमेंट्री व देशभक्तीपर गीत अशा सुमारे अडीच तासाच्या विशेष सांस्कृतिक

.

यासंदर्भात माध्यमांशी बोलताना विदर्भ सिंधी विकास परिषदेचे अध्यक्ष तुलसी सेतिया म्हणाले, फाळणीच्या वेळी सिंधी समाजाने सहन केलेल्या वेदना आणि त्यांच्या ऐतिहासिक स्मृतींना उजाळा देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. फाळणीच्या शोकांतिकेवर आधारित किशोर लालवानी लिखित आणि तुलसी सेतिया दिग्दर्शित ‘हीउ मुहिंजो वतनु’ या नाटकाचे सादरीकरण स्थानिक कलाकार करतील. या नाटकाचे ऑडिओ रेकॉर्डिंग व संगीत गिरीश नारायण यांचे आहे. ४० ते ४५ मिनीटांच्या या नाटकानंतर फाळणीची वेदनादायक कहाणी दर्शवणारा लघुचित्रपट (डॉक्युमेंटरी फिल्म) व देशभक्तीपर गीते सादर केली जाणार असल्याचे विदर्भ सिंधी विकास परिषद महिला संघाच्या अध्यक्षा राजकुमारी झांबानी यांनी स्पष्ट केले.

या वेळी परिषदेचे कार्याध्यक्ष, माजी नगरसेवक सुरेंद्र पोपली, उपाध्यक्ष मोहनलाल मंधानी, जुम्मनदास बजाज, नानकराम मूलचंदानी व डेटाराम मनोजा, महासचिव पंडित दीपक शर्मा आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांनीही या कार्यक्रमाची पुरक माहिती माध्यमांसमोर ठेवली. शिवाय अमरावतीकर नागरिक, मातृशक्तीने उपस्थित राहण्याचे आवाहनही केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *