Headlines

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये ऊस रोपवाटिका प्रशिक्षण:30 ऊस उत्पादक शेतकरी सहभागी, दर्जेदार बेणे निर्मितीवर भर




वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्हीएसआय) येथे ऊस पिकासाठी दर्जेदार बेणे निर्मिती, ऊस रोपवाटिका तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन या विषयांवरील तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमास सुरुवात झाली. भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना लिमिटेड, लक्ष्मीनगर, जिल्हा नांदेड यांच्या वतीने आयोजित या प्रशिक्षणात 30 ऊस उत्पादक शेतकरी सहभागी झाले आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्हीएसआयचे महासंचालक संभाजी कडूपाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन नरेंद्रदादा चव्हाण उपस्थित होते. यावेळी बोलताना संभाजी कडूपाटील म्हणाले, “ऊस उत्पादन आणि उत्पादकता वाढीसाठी बेणे बदल अत्यंत महत्त्वाचा आहे. शेतकऱ्यांना शुद्ध, निरोगी तसेच रोग व किडींपासून मुक्त दर्जेदार रोपे उपलब्ध होणे आवश्यक आहे. त्यासाठी शास्त्रीय पद्धतीने ऊस रोपवाटिका विकसित करणे गरजेचे आहे.” नरेंद्रदादा चव्हाण यांनी कारखान्याच्या कार्यक्षेत्रात व्हीएसआयया सहकार्याने बेणे बदल कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना दर्जेदार व निरोगी बेणे उपलब्ध होऊन ऊस उत्पादनात वाढ होण्यास मदत मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रशिक्षणादरम्यान शेतकऱ्यांना रोपवाटिका उभारणी, बेणे निवड, लागवड पद्धती, रोग-किडींचे व्यवस्थापन आणि उत्पादनवाढीच्या आधुनिक तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. प्रशिक्षण माध्यमातून शेतकऱ्यांना चांगली उत्पादकता घेण्यासाठी प्रेरित केले जाणार आहे. यावेळी कृषी विभाग प्रमुख डॉ. अशोक कडलग, बारामती कृत्रिम बुद्धिमत्ता प्रकल्पाचे समन्वयक तुषार जाधव तसेच व्हीएसआयचे शास्त्रज्ञ उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. समाधान सुरवसे यांनी केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *