![]()
भारताच्या हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील आघाडीची कंपनी ‘गादिया ग्रुप’ने देशातील वेडिंग इकॉनॉमीला (विवाह अर्थव्यवस्था) एक नवे रूप देण्यासाठी आपल्या महत्त्वकांक्षी ‘100 मंगलम्’ उपक्रमाची घोषणा केली आहे. या नाविन्यपूर्ण प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट र. 10,000 ₹कोटींच्या गुंतवणुकीसह देशभरात 100 प्रीमियम वेडिंग डेस्टिनेशन स्थापन करणे हे आहे, जेणेकरून मध्यमवर्गीय कुटुंबांना डेस्टिनेशन वेडिंग अधिक सुलभ आणि किफायतशीर दरात उपलब्ध होऊ शकेल. लाखो कुटुंबांचे स्वप्न होणार साकार गादिया ग्रुपचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक शिरीष गादिया यांनी सांगितले की, भारताचा विवाह उद्योग हा जगातील सर्वात मोठ्या उत्सव-आधारित अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. परंतु, विवाहस्थळा (व्हेन्यू)चा मोठा खर्च आणि यजमानत्वाचा (हॉस्पिटॅलिटीचा) वाढता खर्च यामुळे डेस्टिनेशन वेडिंग आतापर्यंत केवळ श्रीमंत वर्गापुरतेच मर्यादित राहिले आहे. ‘100 मंगलम्’ उपक्रम याच वाढत्या खर्चाची दरी कमी करून मध्यमवर्गीय कुटुंबांचे स्वप्न साकार करेल. छत्रपती संभाजीनगर जवळील (मौजेपुरी) पहिल्या प्रकल्पाचे यश याचे उत्तम उदाहरण असून, तिथे आतापर्यंत 17-18 विवाह सोहळे यशस्वीपणे पार पडलेले आहेत. आणि 40 विवाहाचे बुकींग्जही मिळालेले आहेत. अनोखा पार्टनरशिप आणि मेंबरशिप मॉडेल या योजनेअंतर्गत जमीन मालकांसाठी एक विशेष ‘लँडओनर पार्टनरशिप मॉडेल’ (संयुक्त उपक्रम) तयार करण्यात आला आहे. यामध्ये जमीन विकण्याऐवजी, मालक स्वतःचे मालकी हक्क कायम ठेवून प्रकल्पाच्या नफ्यात भागीदार होऊ शकतात. यासाठी मुख्य निकष म्हणजे प्रमुख शहरापासून 30 किमीच्या आत 25-30 एकर जमीन, उत्तम रस्ता आणि पाण्याची उपलब्धता असणे आवश्यक आहे. ग्राहकांसाठी दोन प्रकारची मेंबरशिप प्रस्तावित आहे सुरक्षा, तंत्रज्ञान आणि सामाजिक बांधिलकी प्रकल्पात आर्थिक पारदर्शकता आणि सुरक्षेसाठी ‘एआय-आधारित’ (App-based) गव्हर्नन्स फ्रेमवर्क आणि एस्क्रो अकाउंट सुरक्षा प्रणाली लागू केली जाईल. याशिवाय, गादिया ग्रुपने सामाजिक जबाबदारी म्हणून या प्रकल्पाची व्यवस्थापकीय धुरा भारतीय सशस्त्र दलातील सेवानिवृत्त माजी सैनिकांकडे सोपवली आहे. कंपनीने भविष्यात संरक्षण दलातील कुटुंबांसाठी राखीव मेंबरशिप आणि शहीद सैनिकांच्या कुटुंबांना निवडक सुविधा मोफत देण्याची घोषणाही केली आहे. हा प्रकल्प केवळ लग्नापुरता मर्यादित न राहता कॉर्पोरेट इव्हेंट्स, धार्मिक पर्यटन, वेलनेस रिट्रीट्स आणि फिल्म शूटिंगसाठी देखील एक बहुआयामी हॉस्पिटॅलिटी इकोसिस्टम म्हणून विकसित केला जाईल.
Source link
गादिया ग्रुपतर्फे ‘100 मंगलम्’ प्रोजेक्टचे अनावरण:भारताच्या वेडिंग इकॉनॉमीमध्ये 10,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे उद्दिष्ट