Headlines

धीरज राजपूत हत्या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवा:आमदार संग्राम जगतापांची मागणी; पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह




अहिल्यानगर महानगरपालिकेच्या विद्युत विभागात कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत असलेल्या धीरज कचरूसिंग राजपूत-परदेशी यांच्यावर काम करत असताना झालेल्या जीवघेण्या हल्ल्यात 9 ऑगस्ट रोजी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला असून, या घटनेवरून आता राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांनी मयत धीरज यांच्या कुटुंबीयांसमवेत पत्रकार परिषद घेऊन पोलिसांच्या तपासावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तसेच, या हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराचा शोध घेऊन सखोल चौकशी करावी आणि पीडित कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळवून देण्यासाठी हा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी जगताप यांनी केली आहे. संग्राम जगताप म्हणाले, शुक्रवारी 7 ऑगस्टला धीरजसिंग राजपूत महापालिकेचे काम करत असताना जिहादी लोकांनी हल्ला केला. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. जिल्ह्यात संतापाची भावना पाहायला मिळाली. जिल्हा बंदची हाक देखील देण्यात आली. फास्ट ट्रॅकवर खटला चालवण्याची कुटुंबीयांची मागणी आहे. मुख्य सूत्रधारांचा शोध घेतला पाहिजे, सखोल चौकशी झाली पाहिजे, कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती झाली पाहिजे, असे जगताप यांनी म्हटले आहे. पोलिसांनी पुन्हा भूमिका बदलली पुढे बोलताना संग्राम जगताप म्हणाले, पोलिसही सगळे कुठे वेगळीकडे न्यायचा प्रयत्न करत आहेत. आम्हीऊ मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत. आंदोलनानंतर पोलिसांनी पुन्हा भूमिका बदलली. अनधिकृत घरांना नोटीस दिली आहे, पण त्यांनी उच्च न्यायालयातून स्थगिती मिळवली. त्यामुळे सूत्रधार वेगळा आहे. कुटुंबातील कोणाला नोकरीही मिळाली पाहिजे. वरिष्ठ अधिकारी हिंदू लोकांना खोट्या गुन्ह्यात अडकवत आहेत तसेच आरोपींच्या घरावर लावलेल्या नोटीसवर स्थगिती आहे, ती शासनाने उठवण्यासाठी प्रयत्न करावे. अल्पसंख्याकांच्या क्षेत्रात तो त्याच्या कामासाठी गेला होता. स्मशानाच्या ठिकाणी निर्जनस्थळी नेऊन त्याला मारहाण करण्यात आली, त्यात त्याचा मृत्यू झाला. वरिष्ठ अधिकारी हिंदू समाजाच्या लोकांना लक्ष करत आहेत, त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवत आहेत. अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्यात यावं. सूत्रधाराला अद्याप अटक नाहीत. स्थानिक कार्यकर्त्यांवरच पोलिस गुन्हे दाखल करत आहेत, असा आरोप संग्राम जगताप यांनी केला आहे. काय आहे नेमके प्रकरण? मुकुंदनगर परिसरातील दर्गा दायरा येथे पथदिव्यांच्या दुरुस्तीचे काम करत असताना धीरज राजपूत-परदेशी यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या धीरज यांचा 9 ऑगस्ट रोजी उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेचे तीव्र पडसाद शहरात उमटले असून, आमदार संग्राम जगताप यांनी धीरज यांच्या कपाळावरील टिळ्यामुळेच त्यांची हत्या करण्यात आल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. या आरोपामुळे प्रकरणाचे गांभीर्य अधिकच वाढले असून, विविध हिंदुत्ववादी संघटनांनीही या घटनेचा तीव्र निषेध करत आक्रमक पवित्रा घेतला आहे. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवत मोठी कारवाई केली आहे. मुख्य संशयित मुस्तकीम ख्वाजामिया सय्यद, मेहराज इब्राहिम सय्यद आणि सिराज इब्राहिम सय्यद या तिघांना पोलिसांनी थेट हैदराबादमधून बेड्या ठोकल्या आहेत. तसेच, या मुख्य आरोपींना पळून जाण्यासाठी मदत करणाऱ्या ख्वाजामिया उर्फ अकरम याकूब सय्यद आणि वसीम रहीम सय्यद यांना नगरमधून, तर महापालिकेचा वायरमन युनूस खान यालाही अटक करण्यात आली आहे. सध्या या सर्व आरोपींची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. ही देखील बातमी वाचा शिवसेना एकनाथ शिंदेंचीच:2024च्या विधानसभा निकालाने लोकन्यायालयाचे शिक्कामोर्तब, सुप्रीम कोर्टही हाच निर्णय देईल असा विश्वास- फडणवीस सध्या सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ चिन्हावर अत्यंत महत्त्वाची सुनावणी सुरू आहे. गुरुवारी ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केल्यानंतर, आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. “सर्वोच्च न्यायालय यावर आपला निर्णय देईलच, मात्र त्यापूर्वीच 2024च्या विधानसभा निवडणुकीत ‘लोकन्यायालयाने’ शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच असण्यावर शिक्कामोर्तब केले आहे,” असे ठाम मत मुख्यमंत्री फडणवीस यांनी जालना येथे माध्यमांशी संवाद साधताना व्यक्त केले. या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी शिवसेना पक्षनाव, राहुल गांधींवर टीका, चाकण एमआयडीसीचा प्रश्न आणि जातनिहाय जनगणना अशा विविध मुद्द्यांवर सविस्तर भाष्य केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *