Headlines

पुण्यात पाच सराईत गुन्हेगारांकडून चार पिस्तुले, काडतुसे जप्त:मध्य प्रदेशातून आणलेल्या शस्त्रांची विक्री करण्याच्या तयारीत होते आरोपी




स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पुणे गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत पाच सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे. त्यांच्याकडून चार देशी बनावटीची पिस्तुले आणि सहा काडतुसे जप्त करण्यात आली. सहकारनगर परिसरात ही कारवाई करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे सुफियान बशीर शेख (वय २२, रा. धनकवडी), नीलेश प्रभुलिंग कुंभार (वय २१, रा. धनकवडी), तुकाराम बाबासाहेब गवते (वय १९, रा. धनकवडी), ऋषभ शिवाजी भगत (वय २३, रा. भारती विद्यापीठ परिसर) आणि अमित राजाराम पिलावरे (वय २५, रा. शुक्रवार पेठ) अशी आहेत. शहरात अनुचित घटना टाळण्यासाठी स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस ठाणे आणि गुन्हे शाखेच्या पथकांना गस्त घालण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार, गुन्हे शाखेच्या युनिट दोनचे पथक सहकारनगरमधील वनशिव वस्ती परिसरात गस्त घालत असताना, आरोपी शेख, कुंभार, गवते, भगत आणि पिलावरे तेथे थांबले होते. त्यांच्याकडे शस्त्रसाठा असल्याची माहिती पोलीस कर्मचारी शिवानंद कायगुडे आणि उज्ज्वल मोकाशी यांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने सापळा रचून पाचही आरोपींना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता, त्यांच्याकडे देशी बनावटीची पिस्तुले आणि काडतुसे आढळून आली. प्राथमिक तपासात आरोपींनी ही पिस्तुले मध्य प्रदेशातून आणली असून, त्यांची विक्री करण्याच्या तयारीत असल्याचे समोर आले आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्त तेजस्वी सातपुते, उपायुक्त गौहर हसन आणि सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुलकुमार खिलारे, अविनाश माने, उपनिरीक्षक ज्ञानेश्वर दळवी, तेजश्री पवार, शंकर नेवसे, कुंदन शिंदे, नागनाथ राख, विनोद चव्हाण, संदीप शिर्के, साधना ताम्हाणे, शंकर कुंभार, ओंकार कुंभार आणि विद्या शिंदे यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *