Headlines

Someshwar Sugar Factory Pune Record Sugarcane Price Hike; 4000 Per Ton


पुणे जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अतिशय आनंददायी आणि दिलासादायक बातमी आहे. पुणे जिल्ह्यातील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चालणाऱ्या ‘सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने’ उसाला विक्रमी दर देण्याचा मोठा निर

.

संचालक मंडळाच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय

नुकतीच सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत मागील वर्षी (2025-26) गाळप झालेल्या उसाच्या अंतिम दराबाबत सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी उसाच्या दराची अधिकृत घोषणा केली.

महिनानिहाय असा मिळणार ऊसदर

कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील सभासदांना त्यांच्या उसाच्या तुटणीच्या महिन्यानुसार हा दर दिला जाणार आहे.

नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी महिन्यांत तुटणाऱ्या उसाला: 3800 रुपये प्रति टन

फेब्रुवारी महिन्यात तुटणाऱ्या उसाला: 3900 रुपये प्रति टन

मार्च महिन्यात तुटणाऱ्या उसाला: 4000 रुपये प्रति टन (सर्वोच्च दर)

मागील वर्षी ज्या शेतकऱ्यांचा ऊस माळेगाव सहकारी साखर कारखान्याला गेला आहे, त्या शेतकऱ्यांनाही प्रति टन ४ हजार रुपये प्रमाणेच दर मिळणार असल्याची माहिती कारखाना प्रशासनाने दिली आहे.

FRP पेक्षा 515 रुपये अधिक; राज्यातील एकमेव कारखाना

अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी माहिती देताना अभिमानाने सांगितले की, “संपूर्ण महाराष्ट्रात एफ.आर.पी. पेक्षा टनाला तब्बल ५१५ रुपये जास्तीचा ऊसदर देणारा श्री सोमेश्वर कारखाना हा राज्यातील एकमेव आणि पहिलाच कारखाना ठरला आहे.”

कारखान्याची मागील हंगामातील उल्लेखनीय कामगिरी:

सोमेश्वर कारखान्याने केवळ ऊस दरातच नव्हे, तर उत्पादनातही मोठी भरारी घेतली आहे. कारखान्याने एकूण १२ लाख ९८ हजार ५५९.३५ मेट्रिक टन उसाचे गाळप केले. बी-हेवी (B-Heavy) मळीसह कारखान्याचा सरासरी साखर उतारा १२.२७ टक्के राहिला असून, तब्बल १५ लाख ५७ हजार ६५० साखर पोत्यांचे विक्रमी उत्पादन घेण्यात आले आहे. कारखान्याच्या को-जनरेशन प्रकल्पातून १२ कोटी ५३ लाख ४४ हजार ६८० युनिट्स वीजनिर्मिती झाली, ज्यापैकी ८ कोटी ३६ लाख ७० हजार ४८० युनिट्स विजेची विक्री करण्यात आली आहे. तर डिस्टिलरी प्रकल्पातून ८६ लाख २५ हजार १ लिटर अल्कोहोल आणि ४३ लाख ८२ हजार ५६९ लिटर इथेनॉलचे उत्पादन घेण्यात आले.

उर्वरित रक्कम दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात

२०२५-२६ या हंगामासाठी सोमेश्वर कारखान्याची एफ.आर.पी. (FRP) ३२८५ रुपये प्रति टन इतकी होती. त्यापैकी कारखान्याने आतापर्यंत टनाला ३३०० रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केले आहेत. आज घोषित केलेल्या ४ हजार रुपयांच्या विक्रमी दरापैकी जी उर्वरित रक्कम आहे, ती आगामी दिवाळीपूर्वी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याचा निर्णयही आजच्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.कारखान्याच्या या निर्णयामुळे ऐन सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांच्या हातात मोठा पैसा येणार असून, सोमेश्वर कारखान्याने ऊस उत्पादकांना खऱ्या अर्थाने मोठा दिलासा दिला आहे.

हेही वाचा..

‘गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते’: सोनिया गांधींचीही परवानगी होती, पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा गौप्यस्फोट; नेमके काय म्हणाले?

सध्या राज्यात आणि देशात भाजपचे मोठे राजकीय वर्चस्व असून सत्तेसाठी अनेक नेते व पक्ष सत्ताधाऱ्यांसोबत जाण्यास उत्सुक असल्याचे चित्र आहे. ज्याचा प्रत्यय नुकताच ठाकरेंच्या शिवसेनेतील काही खासदारांनी एकनाथ शिंदे गटात केलेल्या प्रवेशावरून आला. राजकारणातील याच बदलत्या संस्कृतीच्या आणि इतिहासाच्या चर्चांदरम्यान, राज्याचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते आणि त्याबाबतचे सर्व काही निश्चित झाले होते. मात्र, ऐनवेळी त्यांचा हा पक्षप्रवेश का रद्द झाला, यामागची पडद्यामागची माहिती चव्हाण यांनी आता उघड केली आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.