![]()
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी २२ ऑगस्ट २०२६ रोजी पुण्यात ‘छात्रो की गुंज’ कार्यक्रमासाठी येणार आहेत. या कार्यक्रमात ते पहिल्यांदाच महिला विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. पुणे हे विद्येचे माहेरघर असल्याने देशभरातून विद्यार्थी येथे शिक्षणासाठी येतात. विद्यार्थ्यांचे अनेक ज्वलंत प्रश्न असून, केंद्र सरकार ते सोडवण्यात अपयशी ठरले आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले. नीट पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले आहे आणि त्याचा मुख्य केंद्रबिंदू पुण्यात होता, यावरही सपकाळ यांनी भर दिला. राहुल गांधी महिला विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांचे प्रश्न जाणून घेतील आणि त्यांच्या भवितव्यासाठी महत्त्वाचे विषय सरकारपुढे मांडतील. त्यांनी यापूर्वीही अनेक ठिकाणी ‘छात्रो की गुंज’ कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांबाबत आपले विचार मांडले आहेत. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी नुकतीच एक बैठक पुण्यात झाली. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, कार्यक्रमाचे मुख्य आयोजक बैजुजी, मनोज त्यागी, महिला अध्यक्षा संध्या सव्वालाखे, माजी मंत्री डॉ. विश्वजीत कदम, येशामती ठाकुर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष रमेश बागवे, मोहन जोशी, बाबु नायर, सुनिल मलके, पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी पश्चिम विभागाचे अध्यक्ष दीप्ती चवधरी, पूर्व विभागाचे अध्यक्ष प्रशांत जगताप, जिल्हाध्यक्ष लहुअण्णा निंवगुणे, गटनेते चंदूशेठ कदम यांच्यासह अनेक पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीचे प्रास्ताविक पश्चिम विभागाच्या अध्यक्ष दीप्ती चवधरी यांनी केले, तर पूर्व विभागाचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी कार्यक्रमासंदर्भात सूचना मांडल्या. सर्व काँग्रेस नेते, पदाधिकारी, नगरसेवक, फ्रंटल संघटना, सेल आणि कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करून हा कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन सपकाळ यांनी केले. उपस्थित पुणे शहरातील काँग्रेस नेते, पदाधिकारी आणि नगरसेवकांनीही कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपापल्या सूचना दिल्या.
Source link
राहुल गांधींचा पुण्यात 'छात्रो की गुंज' कार्यक्रम:पहिल्यांदाच महिला विद्यार्थ्यांशी संवाद साधणार, शिक्षण प्रश्नांवर चर्चा