आपल्या धडक कारवाईसाठी ओळखले जाणारे अन्न आणि औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आता आपला मोर्चा थेट बॉलिवूडच्या बड्या स्टार्सकडे वळवला आहे. महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या ‘विमल पान मसाला’ची ‘सरोगेट’ (अप्रत्यक्ष) जाहिरात केल्याप्रकरणी सु
.
‘विमल पान मसाला’ की ‘विमल इलायची’?
अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ हे तीनही अभिनेते ‘विमल इलायची’च्या जाहिरातीत एकत्र झळकले होते. ‘विमल इलायची’च्या नावाखाली प्रत्यक्षात ‘विमल पान मसाला’ या तंबाखू आणि निकोटीनयुक्त गुटख्याची अप्रत्यक्ष (Surrogate Advertising) जाहिरात केली जात असल्याचा ठपका एफडीएने ठेवला आहे. महाराष्ट्रात 13 जुलै 2026च्या सुधारित आदेशानुसार तंबाखू आणि निकोटीनयुक्त गुटखा आणि पान मसाल्याच्या उत्पादन, साठवणूक, वितरण आणि विक्रीवर बंदी आहे.
नोटिशीत काय म्हटले आहे?
या तिन्ही कलाकारांना एफडीएने कठोर शब्दांत नोटीस पाठवली असून पुढील निर्देश दिले आहेत:
1. जाहिरात तत्काळ थांबवा: ‘विमल पान मसाला/इलायची’च्या जाहिरातीतील तुमचा सहभाग तात्काळ थांबवा.
2. प्रमोशनल मजकूर हटवा: तुमच्या सर्व अधिकृत सोशल मीडिया हँडल आणि वेबसाइटवरून या जाहिरातीशी संबंधित सर्व प्रमोशनल मजकूर काढून टाका.
3. 15 दिवसांत स्पष्टीकरण द्या: या प्रकरणी तुमच्यावर कायदेशीर कारवाई का करू नये? तसेच या जाहिरातीतील तुमच्या भूमिकेबाबत सविस्तर लेखी स्पष्टीकरण १५ दिवसांच्या आत सादर करा.
ही नोटीस अजय देवगणला त्याच्या जुहू येथील घरी, शाहरुख खानला वांद्रे येथील ‘मन्नत’ बंगल्यावर आणि टायगर श्रॉफला त्याच्या ‘टायगर श्रॉफ प्रॉडक्शन्स एलएलपी’ या प्रॉडक्शन हाऊसच्या माध्यमातून पाठवण्यात आली आहे.
कायदेशीर तरतुदी आणि दंडाची शक्यता
एफडीएने ‘अन्न सुरक्षा आणि मानके (FSS) कायदा, 2006’ च्या कलम 24 आणि 53 अंतर्गत ही कारवाई केली आहे. दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर बंदी घालणाऱ्या या कलमांनुसार, जाहिरातीत सहभागी असलेल्या व्यक्तीला 10 लाख रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो.
तुकाराम मुंढेंची धडक कारवाई आणि MCOCA चा बडगा
तुकाराम मुंढे यांनी एफडीए आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून गुटखा आणि प्रतिबंधित पदार्थांवर मोठी कारवाई सुरू केली आहे. 12 जून 2026 रोजी मुंढे यांनी पोलिसांच्या मदतीने गुटख्याचा काळाबाजार करणाऱ्या संघटित टोळ्यांवर थेट ‘मोक्का’ (MCOCA) अंतर्गत कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. 25 मे ते 31 जुलै या काळात एफडीएने 658 ठिकाणी छापे टाकून 15.11 कोटी रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला. तसेच 519 एफआयआर (FIR) नोंदवत 701 जणांना अटक केली आहे. या कठोर कारवाईमुळे आता बॉलिवूड सेलिब्रिटीजही एफडीएच्या रडारवर आले असून, शाहरुख, अजय आणि टायगर या नोटिशीला काय उत्तर देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा…
उदय सामंत चाकण एमआयडीसीत येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या:मध्यरात्रीतच बुजवले खड्डे, उद्योगांच्या प्रश्नांची सरकारकडून गंभीर दखल

पुण्यातील चाकण एमआयडीसीत (Chakan MIDC) सध्या वाहतूक कोंडी, खड्डे आणि रस्त्यांची दुरवस्था यामुळे उद्योजक आणि कामगार हैराण झाले आहेत. याच त्रासाला कंटाळून 20 लघुउद्योगांनी आपल्या कंपन्या इतरत्र स्थलांतरित करण्याची प्रक्रिया सुरू केल्याचे वृत्त समोर आले आणि राज्यातील राजकारण चांगलेच तापले. अखेर या प्रकरणाची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली असून, उद्योगांच्या समस्या सोडवण्यासाठी पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली 14 सदस्यीय ‘उच्चस्तरीय समिती’ आणि ‘उद्योग तक्रार निवारण कक्ष’ स्थापन करण्याचा मोठा निर्णय शासनाने घेतला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी