Headlines

Sudhir Mungantiwar Slams Prithviraj Chavan Over Gopinath Munde Remark


“स्वर्गीय गोपीनाथ मुंडे आता हयात नसताना त्यांच्या निष्ठेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करणे हे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारख्या मोठ्या नेत्याला अजिबात शोभत नाही. मृत्यूनंतर ज्या व्यक्तीला स्वतःचे खंडन करता येत नाही, अशा व्यक्तीवर चर्चा करण

.

नेमका वाद काय?

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी अलीकडेच एक खळबळजनक दावा केला होता. “भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते. त्यांच्या पक्षप्रवेशाला काँग्रेसच्या तत्कालीन अध्यक्षा सोनिया गांधी यांनी संमती (हिरवी झेंडी) दिली होती, मात्र तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी नकार दिल्याने हा प्रवेश टळला,” असे चव्हाण म्हणाले होते.

सुधीर मुनगंटीवार यांचा पलटवार

या दाव्याला उत्तर देताना मुनगंटीवार म्हणाले, “पृथ्वीराज चव्हाण हे राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत आणि एक मोठे नेते आहेत. त्यांनी गोपीनाथ मुंडेंसारख्या नेत्याच्या निष्ठेवर आता प्रश्नचिन्ह निर्माण करणे अत्यंत चुकीचे आहे. मृत्यूनंतर संबंधित व्यक्ती स्वतःची बाजू मांडू शकत नाही, त्यामुळे आता अशा चर्चांचे काहीही कारण नव्हते.”

सोनिया गांधींपेक्षा मनमोहन सिंग श्रेष्ठ होते का?

चव्हाणांच्या दाव्यातील राजकीय अर्थ काढताना मुनगंटीवार यांनी काँग्रेसलाच कोंडीत पकडले. ते म्हणाले, “चव्हाणांच्या या वक्तव्यातून असे दिसते की, काँग्रेस पक्षात सोनिया गांधींपेक्षाही डॉ. मनमोहन सिंग हे श्रेष्ठ होते. कारण सोनियाजींनी हिरवी झेंडी दाखवूनही मनमोहन सिंगांनी त्यांना थांबवले, हे कोणालाही पटणारे नाही. हा काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणाचा भाग असू शकतो.”

वंदे मातरम् हा शब्दांचा समुच्चय नाही, तर रक्तातील ऊर्जा

स्वातंत्र्यदिनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी ‘वंदे मातरम्’बाबत कथित आक्षेप नोंदवल्याच्या चर्चेवरही मुनगंटीवार यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. “जर सोनिया गांधींनी ‘वंदे मातरम्’ला अडकाठी आणली असेल, तर ती अतिशय चिंताजनक बाब आहे. कदाचित त्यांना या देशाचा इतिहास माहिती नसेल. ‘वंदे मातरम्’ हे केवळ भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी लिहिलेले गीत नाही, तर संविधान सभेने चर्चा करून याला ‘राष्ट्रगान’ म्हणून मान्यता दिली आहे. पंडित नेहरूंनी काढलेले नोटिफिकेशन पाहिले, तरी त्यांना ते समजेल.”

“महाराष्ट्रातील एका कवीने लिहिल्याप्रमाणे, ‘वेदमंत्राहून आम्हा वंद्य वंदे मातरम्’… हे गीत केवळ शब्दांचा समुच्चय किंवा कविता नाही. शहिदांनी फासावर जाताना याच शब्दांची ऊर्जा घेऊन छातीवर गोळ्या झेलल्या आहेत. त्यामुळे या शब्दांवर आक्षेप घेणे ही सोनिया गांधींची सर्वात मोठी चूक ठरेल.”

सरन्यायाधीशांच्या वक्तव्यावरही प्रतिक्रिया

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी केलेल्या एका वक्तव्याचा विपर्यास करून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न झाल्याच्या मुद्द्यावरही मुनगंटीवार यांनी भाष्य केले. “सरन्यायाधीशांनी स्वतः स्पष्टीकरण देऊन ती संदिग्धता संपवली आहे. त्यामुळे आता यावरून नाहक वाद निर्माण करून युवकांमध्ये भ्रम पसरवण्याचे कारण उरलेले नाही,” असे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा…

गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये जाणार होते?: पृथ्वीराज चव्हाणांच्या दाव्यावर पंकजा मुंडे म्हणाल्या- माझे वडील कमळात जन्मले अन् कमळातच विसावले

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते, असा दावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केल्यानंतर राज्याच्या राजकारणात चर्चेला सुरुवात झाली आहे. या वक्तव्यावर गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया देत, आता दिवंगत नेत्याच्या जुन्या राजकीय घडामोडींवर चर्चा करणे योग्य नसल्याचे म्हटले आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.