रायगड जिल्ह्यातील महाड औद्योगिक वसाहतीत (MIDC) एक दुर्दैवी दुर्घटना उघडकीस आली आहे. येथील ‘इंडो अमायन्स’ या रासायनिक कंपनीत शनिवारी संध्याकाळी अचानक विषारी वायूची गळती झाली. या दुर्घटनेत एका कामगाराला आपले प्राण गमवावे लागले असून, अन्य ८ जण गंभीररीत्
.
नेमकी दुर्घटना कशी घडली?
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी संध्याकाळी महाड MIDC मधील ‘इंडो अमायन्स’ कंपनीत नेहमीप्रमाणे काम सुरू होते. याच वेळी कंपनीतील हायड्रोक्लोरिक ॲसिडमधून निघणाऱ्या विषारी वायूची अचानक गळती सुरू झाली. गॅसचा प्रभाव आणि तीव्रता इतकी होती की, कंपनीत काम करणाऱ्या कामगारांना तात्काळ गुदमरल्यासारखे होऊ लागले आणि त्यांना श्वसनाचा त्रास सुरू झाला. धक्कादायक बाब म्हणजे, या गॅसचा फटका केवळ कंपनीतील कामगारांनाच बसला नाही, तर कंपनीला लागून असलेल्या मुख्य रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या काही नागरिकांनाही या विषारी वायूची बाधा झाली.

एकाचा मृत्यू, तर ८ जणांवर उपचार सुरू
गॅस गळतीमुळे अत्यवस्थ झालेल्या सर्व बाधितांना तातडीने उपचारासाठी महाड येथील एमएमए (MMA) रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर तातडीने प्रथमोपचार करण्यात आले. मात्र, काहींची प्रकृती अधिक गंभीर असल्याने त्यांना पुढील सघन उपचारांसाठी शहरातील स्थानिक खासगी रुग्णालयांत हलवण्यात आले. यातील एका कामगाराची प्रकृती उपचारादरम्यान अधिक खालावली आणि दुर्दैवाने त्याची प्राणज्योत मालवली. सध्या उर्वरित ८ जणांवर रुग्णालयात उपचार सुरू असून वैद्यकीय पथक त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे.
सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
या दुर्घटनेनंतर महाड औद्योगिक वसाहतीत भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, पोलीस आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. मात्र, रासायनिक कंपन्यांमधील सुरक्षिततेचा मुद्दा या निमित्ताने पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. ही गळती नेमकी कोणत्या तांत्रिक बिघाडामुळे झाली आणि यात व्यवस्थापनाचा काही हलगर्जीपणा आहे का? याचा सविस्तर तपास आता संबंधित प्रशासनाकडून केला जात आहे.
हेही वाचा..
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये जाणार होते?: पृथ्वीराज चव्हाणांच्या दाव्यावर पंकजा मुंडे म्हणाल्या- माझे वडील कमळात जन्मले अन् कमळातच विसावले

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते, असा दावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केल्यानंतर राज्याच्या राजकारणात चर्चेला सुरुवात झाली आहे. या वक्तव्यावर गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया देत, आता दिवंगत नेत्याच्या जुन्या राजकीय घडामोडींवर चर्चा करणे योग्य नसल्याचे म्हटले आहे. सविस्तर वाचा