Headlines

भाविकांमध्ये उत्साह:भिलटेक, कोंडेश्वर, तपोवनेश्वरात भाविकांची गर्दी उसळणार




श्रावण सोमवार आणि नागपंचमी एकत्र येणे हा अत्यंत दुर्मिळ आणि शुभ योग मानला जातो. श्रावण महिना हा पूर्णपणे देवाधिदेव महादेवांच्या उपासनेसाठी समर्पित असून नागपंचमी हा दिवस नागदेवतेच्या पूजेसाठी खास मानला जातो. भगवान शिव हे आपल्या गळ्यात वासुकी नागाला धारण करतात, त्यामुळे या दोन्ही सणांचा एकाच दिवशी किंवा एकाच काळात संयोग होणे धार्मिक व आध्यात्मिकदृष्ट्या अत्यंत पवित्र मानले गेले आहे. मराठी भाषिकांचा पहिला श्रावण सोमवार १७ रोजी असून याच दिवशी नागपंचमीही असल्यामुळे शहरातील मोठे शिवालय गडगडेश्वर, कोंडेश्वर, तपोवनेश्वर व इतर ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी उसळणार आहे. भगवान शंकर आणि नागदेवता यांचा घनिष्ठ संबंध आहे. त्यामुळेच श्रावण सोमवारी शिवालयांमध्ये प्रचंड गर्दी होणार असल्यामुळे शहरातील काही भाविकांनी पूर्वसंध्येलाच कावड यात्रा काढली. नागपंचमीला जमिनीचे खोदकाम करणे, शेतात नांगरणी करणे किंवा कात्री, सुरीचा वापर करणे टाळले जाते. त्याचप्रमाणे कोणाच्या घरी भात तर कोणाकडे पोळी तयार केली जात नाही. नागपंचमीला कढई करण्याची पद्धत आहे. कढई अर्थात हलवा तयार करणे. या प्रसादाचे नागपंचमीला विशेष महत्त्व असून घरोघरी हा प्रसाद तयार केला जातो. पूजनाची पद्धत व नियम सकाळी स्नान उरकून शिवलिंगावर जल, दूध, बेलपत्र, अक्षता व पांढरी फुले अर्पण करून ॐ नमः शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप करणे हितावह आहे. तसेच घरात किंवा मंदिरात नागदेवतेच्या प्रतिमेची किंवा मूर्तीची पूजा करावी. त्यांना दूध, लाह्या (ज्वारीच्या,तांदळाच् या) आणि दुर्वा अर्पण कराव्यात. श्रावण सोमवारचे व्रत ठेवून संध्याकाळी शिवाला नैवेद्य दाखवून उपवास सोडावा, अशी माहिती ज्योतिषाचार्य पं. संजय शहाकार यांनी दिली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *