Headlines

Manoj Jarange Patil Warning To Govt Over Maratha Reservation


“मराठा समाजाला न्याय मिळाला नाही, तर वेळ आल्यास मराठे हे सरकार पाडतील. सरकारने मराठ्यांच्या 58 लाख नोंदींचे कुणबी प्रमाणपत्र आणि व्हॅलिडिटी (जात पडताळणी) द्यायलाच हवी. जर यातील एकही नोंद सरकारने कमी केली, तर गंभीर परिणाम भोगावे लागतील,” असा थेट आणि अ

.

20 ते 25 ऑगस्टदरम्यान मराठवाडा आणि विदर्भाचा दौरा

आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी मनोज जरांगे 20 ते 25 ऑगस्टदरम्यान दौरा करणार आहेत. ते म्हणाले, “माझी तब्येत बरी नसली, तरी मी मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांचा (अकोला, बुलढाणा, यवतमाळ) दौरा करणार आहे. जर तब्येतीमुळे दौरा शक्य झाला नाही, तर मराठा समाजाने आणि युवकांनी घराघरांत जाऊन ही जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घ्यावी. 29 ऑगस्टला आपण अंतरवाली सराटीत आमरण उपोषण करणार आहोत, पण हे उपोषण शांततापूर्ण असेल. जिथे अन्याय होईल, तिथे मराठ्यांच्या पोरांनी आक्रमकपणे आवाज उठवायलाच पाहिजे.”

बावनकुळे आणि शिरसाटांनी मराठ्यांचा तळतळाट घेतलाय

भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे आणि शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांच्यावर जरांगे यांनी घणाघात केला. “बावनकुळे आणि शिरसाट यांनी मराठ्यांचा इतका तळतळाट घेतला आहे की ते गोरगरिबांचे वाटोळे करत आहेत. हे लोक जाणीवपूर्वक याचिका करायला लावत आहेत आणि नाटके करत आहेत. पण 58 लाख नोंदींपैकी एकही नोंद कमी केली, तर आम्ही सरकारला सोडणार नाही.”

राधाकृष्ण विखे-पाटलांच्या भूमिकेवर संशय आणि फडणवीसांना इशारा

मनोज जरांगे यांनी मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट लक्ष्य केले. “विखे-पाटलांनी एक नवीनच प्रकार सुरू केला आहे. ज्यांची कुणबी प्रमाणपत्रे ‘व्हॅलिड’ झाली आहेत, त्यांच्या फेरतपासण्या लावल्या जात आहेत. सरकारने सांगावे, फक्त मराठ्यांच्याच फेरतपासण्या लावल्या आहेत की ओबीसी, एससी, एसटी सर्वांच्याच? असे जाणीवपूर्वक करून मराठ्यांचा उद्रेक होईल असे वागू नका. फडणवीस साहेब, तुमचे मंत्री माजल्यासारखे करत आहेत. तुमच्या सरकारविषयी सध्या विद्यार्थी, शेतकरी, दलित, मुस्लिम, आदिवासी आणि मराठा समाजात प्रचंड खदखद आहे. केव्हा सत्तेतून निसटून जाल, हे तुम्हाला कळणारही नाही.”

मराठ्यांच्या लेकी-बाळींवर बोलाल, तर याद राखा

ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी ‘मराठा मुली ओबीसी मंत्र्यांच्या घरात घुसतात’ या केलेल्या विधानाचा जरांगे यांनी अत्यंत शेलक्या शब्दांत आणि आक्रमकपणे समाचार घेतला. “मी आतापर्यंत सगळ्या नेत्यांवर बोललो, पण मी कधीच कोणत्याही जाती-धर्माच्या, हिंदू-मुस्लिम-बौद्ध कुणाच्याही लेकी-बाळींवर कधीच बोललो नाही. पण जर कोणी मराठ्यांच्या लेकी-बाळींवर असे बोलत असेल, तर ती 100 टक्के ‘वड्या-वघळीचीच औलाद’ आणि ‘घुरट पैदास’ आहे. जर तुम्ही आमच्या गरीब मराठ्यांच्या लेकींबद्दल असे बोलणार असाल, तर मग आम्ही तुमच्याबद्दल बोलू का? मराठ्यांची पोरं आता शांत बसणार नाहीत, आम्हीही यापेक्षा वाईट थराला जाऊ शकतो.”

अभ्यासकांना त्यांची जागा दाखवली

काल 16 ऑगस्ट रोजी जरांगे यांनी राज्यातील अभ्यासकांना बोलावले होते, मात्र अनेक जण उपस्थित राहिले नाहीत. यावर जरांगे म्हणाले, “मी माझे कर्तव्य पार पाडले. मला कुणीही म्हणू नये की जरांगे आम्हाला बोलू देत नाही. पण जे लोक आले नाहीत, त्यांनी सिद्ध केले आहे की त्यांना गोरगरिबांशी आणि मराठा समाजाशी एकनिष्ठ राहायचे नाहीये, त्यांना फक्त मीडियात जाऊन स्वतःचे ज्ञान पाजळायचे आहे.”

सरकारने निर्णय घेतल्यास पुढील भूमिका काय?

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारकडून अचानक कोणताही निर्णय होऊ शकतो, असा दावा जरांगे पाटील यांनी केला आहे. सरकारने काही निर्णय घेतला किंवा आंदोलनाला रोखण्यासाठी काही भूमिका घेतली तर त्याला आपणही प्रत्युत्तर देऊ, असे त्यांनी यापूर्वी स्पष्ट केले होते. आता 29 ऑगस्टच्या आंदोलनापूर्वी मराठवाडा आणि विदर्भाचा दौरा, 58 लाख कुणबी नोंदींचे प्रमाणपत्र आणि वैधता, तसेच नोंदी कमी न करण्याची मागणी या मुद्द्यांवरून जरांगे पाटील यांनी सरकारवर दबाव वाढवला आहे. त्यामुळे 29 ऑगस्टला अंतरवाली सराटीत होणाऱ्या आंदोलनापूर्वी सरकार मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर कोणती भूमिका घेते आणि जरांगे पाटील पुढील आंदोलनाची दिशा कशी ठरवतात, याकडे आता राज्याचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा…

OBC नेत्यांची गोंडस मुलं, पैसा पाहून मराठा मुली घरात घुसतात:नवनाथ वाघमारेंच्या वक्तव्याने राज्यभरात संतापाची लाट, ठिकठिकाणी निषेध

ओबीसी समाजाचे नेते नवनाथ वाघमारे यांनी मराठा समाजाच्या तरुणींबद्दल अत्यंत आक्षेपार्ह आणि धक्कादायक विधान केले आहे. “ओबीसी नेत्यांची सुंदर मुले आणि पैसा पाहून मराठा समाजाच्या तरुणी त्यांच्या घरात घुसतात,” असे संतापजनक वक्तव्य वाघमारे यांनी केले आहे. या विधानानंतर राज्यभरात मोठा वाद पेटला असून, मराठा समाजातील महिला कमालीच्या आक्रमक झाल्या आहेत. ठिकठिकाणी वाघमारे यांच्या विरोधात निदर्शने केली जात असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.