Headlines

पुण्यात सदनिकेचे कुलूप तोडून 8 लाखांची चोरी:आंबेगाव बुद्रुकसह 3 ठिकाणी घरफोडी, एकूण 9 लाखांहून अधिक ऐवज लंपास




पुणे शहरात घरफोडीच्या तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. आंबेगाव बुद्रुक येथे एका सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी आठ लाख पाच हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोकड चोरली. याशिवाय, सिंहगड रस्ता परिसरात एका ज्येष्ठ नागरिकाच्या घरातून ३८ हजार रुपयांचे दागिने, तर येरवड्यातील एका किराणा दुकानातून ३५ हजार ५०० रुपयांची रोकड आणि मोबाईल चोरीला गेला आहे. आंबेगाव बुद्रुक येथील सिंहगड महाविद्यालयाजवळील शिवालय विहार सोसायटीत ही घटना घडली. तक्रारदार कुटुंब १० ऑगस्ट रोजी परगावी गेले असताना चोरट्यांनी त्यांच्या सदनिकेचे कुलूप तोडले. बेडरूममधील कपाट उचकटून सोन्याचे दागिने आणि रोकड असा एकूण आठ लाख पाच हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. कुटुंब परतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक नीलेश मोकाशी पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून, सोसायटीतील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. दुसऱ्या एका घटनेत, सिंहगड रस्ता परिसरातील सईनगर सोसायटीत राहणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिकाच्या घरात चोरी झाली. चोरट्याने बनावट चावीचा वापर करून सदनिकेचे कुलूप उघडले आणि कपाटातून चांदीच्या वस्तू व सोन्याची कुडी असा ३८ हजार रुपयांचा ऐवज चोरला. याप्रकरणी पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक एस. माने तपास करत आहेत. तिसऱ्या घटनेत, येरवड्यातील रामवाडी परिसरात असलेल्या एका किराणा दुकानाला चोरट्यांनी लक्ष्य केले. दुकानाचे कुलूप तोडून गल्ल्यातील रोकड आणि एक मोबाईल असा एकूण ३५ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेण्यात आला. याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक एन. बोराडे तपास करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *