Headlines

पैठण रस्त्यावरील कुतुबखेडा फाट्यावर अपघात‎:कंटेनरने दिली कारला धडक;‎अपघातात 2 ठार, एक जखमी‎




भरधाव आयशर कंटेनरने‎समोरून आलेल्या कारला‎समोरून जोरदार धडक दिली. या‎भीषण अपघातात दोन जणांचा‎जागीच मृत्यू झाला, तर एक जण‎गंभीर जखमी झाल्याची दुर्घटना‎पाचोड-पैठण राज्य महामार्गावरील‎कुतुबखेडा (ता. पैठण)‎फाट्याजवळ एचपी पेट्रोल‎पंपासमोर रविवारी (१६ ऑगस्ट)‎रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास‎घडली. अपघात घडताच मोठा‎आवाज आला. त्यामुळे‎आसपासच्या नागरिकांनी‎घटनास्थळी धाव घेत मदतकार्य‎करत जखमींना बाहेर काढले.‎पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात‎दाखल केला असता या वेळी‎उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्याने‎तपासून दोघांना मृत घोषित केले,‎तर जखमीवर प्राथमिक उपचार‎करून पुढील उपचारासाठी‎छत्रपती संभाजीनगर येथील घाटी‎रुग्णालयात पाठवले.‎
दादासाहेब विठ्ठल औटे (२५),‎महादेव सुभाष महानोर (२६,‎दोघेही रा. दावरवाडी, ता. पैठण)‎अशी मृतांची नावे आहेत, तर‎प्रकाश लक्ष्मण भवरे (३०) हे‎गंभीर जखमी आहेत.‎



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *